"और बाक़ी कुछ बचा, तो महँगाई मार गई…" ८० च्या दशकामध्ये लिहिले गेलेले आणि आजपर्यंत लोकप्रिय असलेले कालातीत असे "महागाई-गीत"… महागाई तेव्हाही होती, आताही आहे, उद्या देखील राहणार… वेतन (सॅलरी), पैसे कितीही असली तरी नेहमीच अपुरेच पडतात, !!!! पण म्हणून आपण देखील नव-नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायचे टाळत नाहीच ना… वॉलेटवर दिवसेंदिवस वाढत जाणारा आर्थिक बोजा आणि सोबत असणारी महागाई ह्यांचे नाते घट्ट होते.
कुटुंबासाठीच्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून कोणीही सुटलेला नाही. म्हणूनच इन्शुरन्स क्षेत्रामधील बहुतेक कंपन्या “टर्म इन्शुरन्स प्लॅन” म्हणजे “मुदत विमा योजनांचा” पर्याय सुचवितात. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणारी टर्म इन्शुरन्सची “डेथ-क्लेमची रक्कम” दोन प्रकारे प्राप्त होते. “एकरकमी मिळणारे पेआउट”(Lump Sum) पॉलिसीधारकाच्या कुटुंबाच्या तात्काळ गरजांची काळजी घेतो, जसे की वैद्यकीय स्थिती, मुलांचे विवाह इत्यादि. तर, “मासिक पेआउटचा पर्याय” (Monthly Income) पॉलिसीधारकाच्या कुटुंबाचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या मुलांच्या शिक्षणाची, जोडीदार किंवा काही वेळा वृद्ध माता-पिता यांची काळजी घेण्यासाठी चांगला आहे.
मात्र भोवतालची आर्थिक परिस्थिती सातत्याने गतिमान असते. महागाईचा वाढत जाणारा दर आणि कुटूंबाच्या बदलत्या, वाढत्या आर्थिक गरजा यांची स्पर्धा सुरु होते. तेव्हा वाढत्या आर्थिक आवश्यकतांनुसार वाढत जाणारे लाइफ कव्हर देणारे टर्म इन्शुरन्स घेणे, ह्यावरचे one of the best options असू शकेल. सामान्यतः टर्म प्लॅनचे देखील 2 कार आहेत.
साधा सरळ मुदत विमा प्लॅन (Level Term Insurance Plan)
यामध्ये पॉलिसी टर्मच्या संपूर्ण कालावधीमध्ये आश्वासित केलेली पॉलिसीची रक्कम (Sum Assured) बदलत नाही. पॉलिसी कालावधी मध्ये केव्हाही पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आश्वासित केलेली रक्कम “डेथ-क्लेम” म्हणून दिली जाते आणि पॉलिसी संपुष्टात येते.
वाढीव रक्कमेचा मुदत विमा प्लॅन (Increasing Term Insurance Plan)
यामध्ये पॉलिसी टर्ममधील काही वर्षे आश्वासित केलेली पॉलिसीची रक्कम (Sum Assured) दरवर्षी ठराविक टक्क्यांनी वाढत जाते. आणि निश्चित केलेली “Sum Assured”ची रक्कम गाठल्यानंतर दरवर्षीची वाढ थांबते. घरामधील कमावती व्यक्ती (breadwinner) असलेल्या पॉलिसीधारकाच्या अनुपस्थितीमध्ये देखील कुटुंबाच्या सगळ्या आर्थिक आवश्यकता पूर्ण होतील, त्यांची जीवनशैली पूर्वी-प्रमाणेच कायम राहील आणि सोबत वाढत्या महागाईला तोंड देता येईल, अशा उद्देश्याने या प्लॅनचे डिजाईन केलेले असते.
याचे आपल्याला उदाहरण द्यायचे झाले ते समजा, तुम्ही १,००,००,००० (एक कोटी) रुपयांचा “वाढीव रक्कमेचा टर्म इन्शुरन्स प्लॅन” खरेदी केलात. तर १ कोटी या पॉलिसीची रक्कम दरवर्षी ५% दराने म्हणजे दरवर्षी ५,००,०० रुपयांनी तोपर्यंत वाढणार असेल, जोपर्यंत “Sum Assured” दुप्पट म्हणजे २,००,००,००० (दोन कोटी) होणार नाही. पुढील २१ वर्षांच्या कालावधीमध्ये Sum Assured दुप्पट होईल आणि मग पॉलिसीची रक्कम वाढणे बंद होईल. मात्र, यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या पॉलिसींसाठी प्रीमियमची रक्कम देखील तुलनेने जास्त असते. सामान्यपणे प्रीमियमची रक्कम मात्र वाढत जात नाही. ती संपूर्ण प्रीमियम पेमेंट टर्ममध्ये (PPT) मध्ये समान असते.
याव्यतिरिक वैयक्तिक अपघातसाठी, गंभीर आजारांसाठी किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी विशिष्ट असे अतिरिक्त रायडर म्हणून खरेदी करण्याचे पर्याय पॉलिसीधारकासमोर असतात. अर्थात कोणता टर्म प्लॅन कोणत्या रायडर्स सोबत निवडायचा, हे निश्चित करण्याआधी आपण आपली जीवनशैली, आर्थिक मालमत्ता आणि दायित्वे, आपला व्यवसाय, आपली मेडिकल हिस्ट्री आणि जीवनशैलीसोबत असणारे धोके यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तेव्हा आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा आणि सतत गतिमान, बदलत्या परिस्थितीचा विचार करून मगच टर्म प्लॅनची निवड करणे अत्यावश्यक आहे.