• 04 Oct, 2023 11:05

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Deal Impact on Dogecoin : इलॉन मस्कच्या ट्विटर डीलनंतर डॉजकॉईनच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ!

Twitter Deal Impact on Dogecoin

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk, CEO of Tesla) यांचे क्रिप्टोकरन्सीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेकवेळा क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करून क्रिप्टोमार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. अशीच खळबळ डॉजकॉईनच्या किमतीमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे उडाली.

Twitter Deal Impact on Dogecoin :  इलॉन मस्कने ट्विटरची 44 बिलिअन डॉलर्सची डील पूर्ण केली आणि तिकडे डॉजकॉईनच्या (Dogecoin) किमतीमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk, CEO of Tesla) यांचे क्रिप्टोकरन्सीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. त्यांनी अनेकवेळा क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करून क्रिप्टोमार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या अशा क्रिप्टोकरन्सीवरील प्रेमाचा डॉजकॉईन आणि बिटकॉईनवर लगेच प्रभाव दिसून येतो.

2022च्या सुरूवातीला टेस्ला कंपनीने कंपनीच्या प्रोडक्ट खरेदीसाठी डॉजकॉईनचा पेमेंट म्हणून स्वीकारण्यास सुरूवात केली होती. तसेच मस्कने नवीन परफ्युम ब्रॅण्ड लॉन्च केला तेव्हा त्याच्या खरेदीसाठी सुद्धा इलॉन मस्कने डॉजकॉईनचा पर्याय दिला होता. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायनान्सने इलॉन मस्कच्या ट्विटर खरेदीमध्ये 500 मिलिअन डॉलर्सची गुंतवणूक केली. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) आणि क्रिप्टो (Crypto) यांचा वापर ट्विटरमध्ये कशाप्रकारे केला जाईल. यावर त्यांचे ब्रेनस्टॉर्मिंग सुरू असून लवकरच ट्विटरशी संबंधित क्रिप्टो किंवा एनएफटीची बातमी ऐकायला आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा (Blockchain Technology) वापर करण्याचा प्रयत्न केला होता. जॅक डोर्सी हे स्वत: बिटकॉईनला प्रमोटसुद्धा करायचे. दरम्यान, मस्कने ट्विटर विकत घेण्याचे ठरवल्यानंतर महिन्याभरापूर्वी ट्विटर एक परिपूर्ण अप तयार करणार असल्याचे मस्कने जाहीर केले होते. ज्या अपमधून वापरकर्त्यांना मॅसेजसह पेमेंट्स, ऑनलाईन शॉपिंग किंवा कॅब बुकिंग करता येईल. 

इलॉन मस्कने आजपर्यंत अनेक ट्विट्स करून क्रिप्टोमार्केटमध्ये छोटी-मोठी वादळे आणली आहेत. क्रिप्टोमार्केटमध्ये खूप अस्थिरता असते. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्यावर लगेच परिणाम होतो. हाच दोरा पकडत इलॉन मस्कने गुंतवणूकदारांना पेचात टाकले आहे. अनेकांना यामुळे नुकसान सोसावे लागले. त्यामुळेच इलॉन मस्कला क्रिप्टोमार्केटमधला सर्वात मोठा व्हिलन म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 

इलॉन मस्क यांचे डॉजकॉईनवरचे प्रेम तर सर्वानाच ठाऊक आहे. विनोदातून निर्माण झालेल्या डोजकॉईनबद्दल मस्क यांनी अनेकवेळा ट्विट केले आहे. एका शो वर त्यांनी डोजकॉइनबद्दल केलेल्या विधानाने, डोजकॉइनची किंमत भरपूर वाढली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या विनोदामुळे ती किंमत पुन्हा तितकीच घसरली सुद्धा होती.

ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी प्रति महिना 20 डॉलर चार्ज?

इलॉन मस्कने ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर अनेक गोष्टी बदलण्याचा जणू काही चंगच बांधला आहे. त्यातली एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी युझर्सना प्रत्येक महिन्याला 20 डॉलर खर्च करावा लागणार आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इलॉन हा अल्टीमेटम सर्वप्रथम आपल्याच कंपनीतील कामगारांना दिला आहे. अन्यथा कंपनीतून पॅक अप करण्याचा पर्याय दिला असल्याची बातमी www.theverge.com या वेबसाईटने दिली आहे.