Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या भारत-पाकिस्तानमधील डॉजकॉईनचा सामना!

India Pakistan Crypto Update 2022

India Pakistan Crypto Update 2022 : आज आपण क्रिप्टोकरन्सीमधील महत्त्वाची करन्सी म्हणून नावारूपास आलेल्या डॉजकॉईनचा भारत आणि पाकिस्तानमधील परफॉर्मन्स (Dogecoin rates in Pakistan) पाहणार आहोत.

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून बिटकॉईनकडे (Bitcoin) पहिले जात आहे. पण बिटकॉइनसोबतच आता डॉजकॉईनही (Dogecoin) लोकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. या डॉजकॉईनने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. परिणामी या डॉजकॉईनमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. आज आपण क्रिप्टोकरन्सीमधील महत्त्वाची करन्सी म्हणून नावारूपास आलेल्या डॉजकॉईनचा भारत आणि पाकिस्तानमधील (Cryptocurrency in Pakistan) परफॉर्मन्स  पाहणार आहोत.

बिली मारकस (Bily Markus) आणि जॅक्सन पाल्मर (Jackson Palmer) या जोडगळीने डॉजकॉईन ही पेमेन्ट प्रणाली एक गंमत म्हणून तयार केली होती. डॉजकॉईनची पहिली मेमे कॉईन (Meme coin) अशीही ओळख आहे. डॉजकॉईनवर असलेले चित्र हे शिबा इनू (Shiba Inu) कुत्र्याच्या प्रजातींपैकी एकाचे आहे. 6 डिसेंबर, 2013 मध्ये हा डॉजकॉईन बाजारात आणला गेला. डॉजकॉईनचे आजच्या घडीला क्रिप्टो बाजारातील भांडवल सुमारे 7 बिलियन डॉलर्स इतके आहे. भारतीय चलनात सांगायचे झाले तर 5 लाख 46 हजार कोटी रूपये इतकं आहे.

dogecoin rates in pakistan
  
डॉजकॉईन 6 डिसेंबर, 2013 रोजी बाजारात आणला गेला, तेव्हा त्याची किंमत 0.0003736 डॉलर होती. भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर 2013 मध्ये 1 डॉलरची किंमत 67.95 रूपये इतकी होती. या किमतीनुसार 2013 मध्ये एका डॉजकॉईनची किंमत भारतीय चलनात 0.0204 रूपये इतकी होती. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये डॉजकॉईनची किंमत (Dogecoin rates in Pakistan) काय होती ते ही आपण पाहुया.

पाकिस्तानच्या चलनाला ही रूपया म्हटले जाते. पाकिस्तानी रूपयात डॉजकॉईनची किंमत सांगायची झाली तर, 2013 रोजी एका डॉलरची किंमत 108.58 पाकिस्तानी रुपये एवढी होती. त्यानुसार एका डॉजकॉईनची किंमत 2013 मध्ये 0.0324 पाकिस्तानी रूपये होती.

डॉजकॉईनचे सध्याचे बाजारातील भांडवल सुमारे 7 बिलियन डॉलर्स आहे. भारतीय रुपयात सांगायचे झाले तर ते 5 लाख 46 हजार कोटी इतके आणि पाकिस्तानी रूपयांत 14 लाख 67 हजार कोटी एवढे आहे. डॉजकॉईनचा आत्तापर्यंतचा उच्चांक 0.7376 डॉलर्स एवढा राहिला आहे. भारतीय रूपयात त्याची किंमत 57.65 रूपये तर पाकिस्तानी रूपयात 152.86 एवढी राहिली आहे. आतापर्यंत कालावधीत डॉजकॉईनची किंमत निचांकी पातळीवर घसरून 0.00008547 एवढी झाली होती. भारतीय रूपयात त्याची किंमत 0.0067 रूपये आणि पाकिस्तानी रूपयात 0.018 रूपये एवढी राहिली. 

डॉजकॉईनची पाकिस्तानी रूपयामध्ये किंमत

तुम्ही DOGE ते PKR  एका डॉजकॉईनची  किंवा क्रिप्टोकरन्सीची किंमत (Cryptocurrency in Pakistan) पाकिस्तानी रूपयामध्ये किती होऊ शकते. हे या संकेतस्थळावर पाहू शकता. आज (दि. 17 जून) एका डॉजकॉईनची किंमत 11.64 पाकिस्तानी रूपी आहे. 1 DOGE Dogecoin = 11.64 PKR

भारतीय मार्केटमध्ये डॉजकॉईनचा वॉल्युम 59 अब्ज रूपये आहे आणि पाकिस्तानच्या मार्केटमध्ये 143 अब्ज (Pakistan Crypto Update 2022) एवढा आहे. वॉल्युम म्हणजे क्रिप्टो मार्केटमध्ये झालेली देवाण-घेवाण किंवा खरेदी-विक्री.

क्रिप्टोमार्केटमधील डॉजकॉईनच्या या आकडेवारीवरून भारतीयांना असे वाटू शकते की, क्रिप्टोच्या मॅचमध्ये आपण भारतीय जिंकतोय आणि पाकिस्तान मागे आहे किंवा हरतोय. पण प्रत्यक्षात क्रिप्टोमार्केटमधील या डॉजकॉईनच्या मॅचमध्ये कोणीच जिंकत नाही. डॉजकॉईनची किंमत भारतीय चलनात 4 रूपये आहे तर पाकिस्तानी चलनात 11 रूपये आहे. यावरून असेही वाटू शकते की, डॉजकॉईन भारतात स्वस्त आहे; पण तसे नाही. 

प्रत्यक्षात डॉजकॉईनची किंमत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये समानच आहे. कोणत्याही क्रिप्टो करन्सीचे व्यवहार हे डॉलरमध्ये केले जातात. त्यामुळे मॅच लावायचीच असेल तर सर्वप्रथम डॉलर व भारतीय रुपया आणि डॉलर व पाकिस्तानी रुपया यांचे मूल्यांकन महत्त्वाचे आहे.