Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dogecoin मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, हे तपासून पहा

Dogecoin मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, हे तपासून पहा

Image Source : www.bitvavo.com

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक देश त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करत आहेत. या करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची माहिती घेणे फायदेशीर ठरू शकते.

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून बिटकॉईनकडे पाहिले जात होते. पण बिटकॉईनला डॉजेकॉईनने चांगलेच मागे टाकले आहे. डॉजेकॉईन ही लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. एक गंमत म्हणून सोशल मिडियावर डॉजेकॉईनची सुरूवात झाली होती. पण आता ही लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जात आहे.

डॉजेकॉईन म्हणजे काय?

पोर्टलँडमधील बिली मार्कस आणि ऑरेगॉनमधील जॅक्सन पामर या दोन अभियंत्यांनी 2013 मध्ये बिटकॉईनसारखीच एक नवी क्रिप्टोकरन्सी अस्तित्त्वात आणली, जिचे नाव डॉजेक्वाईन असे ठेवण्यात आले. डॉजेक्वाईनचा कोड डॉजे आहे. डॉजेक्वाईन हे इंटरनेट मायाजालावरील आभासी चलन म्हणजेच व्हर्च्युअल करन्सी आहे. जगप्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे निर्माते एलन मस्क यांनी डॉजेक्वाईनला पसंती दर्शवली होती. त्यांनी डॉजेक्वाईन हे भविष्यातील प्रभावी चलन असेल अशा आशयाच्या केलेल्या एका ट्विटनंतर डॉजेक्वाईनच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली होती.

9 फेब्रुवारी 2021 रोजी डॉजेक्वाईनच्या भावात 31 टक्क्यांनी वाढ झाली होती. सध्या एका डॉजेक्वाईनची किंमत 9.14 रुपये इतकी आहे. 2022 च्या अखेरीपर्यंत ती एक डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. शेअर बाजाराचा विचार करता डॉजेक्वाईन हे पहिल्या 10 क्रिप्टोकरन्सीपैकी एक मानले जाते. 2021 च्या मे महिन्यामध्ये या आभासी चलनाचे बाजारातील भांडवलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. 

डॉजेक्वाईन हे सर्वाधिक परतावा देणारे आभासी चलन म्हणून ही ओळखले जाते. या चलनाने चांगला परतावा दिला आहे. डॉजेक्वाईनचे वैशिष्ट्य म्हणजे बिटकॉईनपेक्षा याची उपलब्धता अधिक आहे. भारतात डॉजेक्वाईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्हणजेच खरेदी करण्यासाठी कॉईन्सविथ क्युबर, वझीर एक्स, कॉईन डीसीएक्स, बिटबन्स, झेबपे यांसारख्या क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्मचे पर्याय उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मद्वारे पैसे ट्रान्स्फर करुन डॉजेकॉईनची खरेदी व विक्री करू शकतो.

डॉजेक्वाईन असो किंवा बिटक्वॉईन या आभासी चलनांच्या विश्वासार्हतेबाबतचे प्रश्नचिन्ह आजही कायम आहे. त्यामुळेच तज्ज्ञांकडून यामध्ये 2 ते 10 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो. आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण झाली असतील आणि जोखीम पत्करण्याची क्षमता अधिक असेल तरच यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.

बिटकॉईन आणि डॉजेकॉईनचा संबंध

डॉजेकॉईन आणि बिटकॉईन बनवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये एकच कोड वापरण्यात आला होता. डॉजेकॉईन हे इन्फेलशनरी चलन आहे. दररोज कोट्यवधी डॉजेकॉईन तयार केले जाऊ शकतात. त्याला कोणतीही मर्यादा नाही. बिटकॉईनच्या बाबतीत मात्र तसे नाही.

डॉजेकॉईनचा वापर

डॉजेकॉईनचा वापर टिपिंग सिस्टमसाठी केला जातो. म्हणजे एखाद्याने चांगले काम केले तर त्याला बक्षीस म्हणून हे कॉईन दिले जातात. रेडिट आणि ट्विटरवर याचा टिपिंग सिस्टमसाठी वापर केला जातो. डिजीटल चलन वापरणाऱ्या लोकांकडून डॉजेकॉईनचा वापर केला जातो.