• 04 Oct, 2022 15:48

बिटकॉईननंतर डॉजकॉईन ठरली जगातील दुसरी मोठी प्रूफ-ऑफ-वर्क क्रिप्टोकरन्सी

Dogecoin Proof-of-Work Cryptocurrency

बिटकॉईन (Bitcoin) सध्या $315 बिलियन डॉलर्सच्या बलाढ्य बाजार भांडवलीकरणासोबत क्रिप्टो मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर डॉजकॉईन (Dogecoin) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारातील भांडवल $7 बिलियन डॉलर्स इतकं आहे.

इथेरिअमच्या विलीनीकरणानंतर डॉजकॉईन (DOGE) ही बिटकॉईन (Bitcoin)नंतरची दुसरी मोठी प्रूफ-ऑफ-वर्क क्रिप्टोकरन्सी (Proof-of-Work Cryptocurrency) बनली आहे. इथेरिअमच्या प्रूफ-ऑफ-वर्कचे विलीनीकरण प्रूफ-ऑफ-स्टेक नेटवर्क (Proof-of-Stake Network)मध्ये झाल्यानंतर डॉजकॉईन अधिकृतपणे दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे.

प्रूफ-ऑफ-वर्क नेटवर्क (Proof-of-Work Network) असणारे बिटकॉईन या शर्यतीत भरपूर पुढे असले तरी डॉजकॉईनची ही झेप नक्कीच वाखाण्याजोगी आहे. बिटकॉईन सध्या $315 बिलियन डॉलर्सच्या बलाढ्य बाजार भांडवलीकरणासोबत उच्च क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर डॉजकॉईन (Dogecoin) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारातील भांडवल $7 बिलियन डॉलर्स इतकं आहे. डॉजकॉईननंतर इथेरिअम क्लासिक (Ethereum Classic) या क्रिप्टोकरन्सीचा तिसरा क्रमांक लागतो. ज्याचे बाजारातील भांडवल $4.69 बिलियन डॉलर्स इतकं आहे.

डॉजकॉईनची पुढची स्पर्धक इथेरियम प्रूफ-ऑफ-वर्क क्रिप्टोकरन्सी (Ethereum Proof-of-Work Cryptocurrency) ठरू शकते, असे सांगितले जात आहे. इथेरिअम प्रूफ-ऑफ-वर्क नेटवर्कचे (Ethereum Proof-of-Work Network) विलीनीकरण प्रूफ-ऑफ-स्टेक नेटवर्कमध्ये जरी झाले असले तरी, इथेरिअम प्रूफ-ऑफ-वर्क नेटवर्कचे मायनिंग सुरु राहणार असल्याचे इथेरिअमच्या अधिकृत वेबसाईटवरून सांगण्यात आले होते. त्यामुळे डॉजकॉईन जरी दुसऱ्या क्रमांकावर आले असले तरी ती जागा किती दिवस कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

प्रूफ-ऑफ-वर्क काय आहे? What is Proof-of-work?

क्रिप्टोकरन्सीजद्वारे नवीन व्यवहार तपासण्यासाठी प्रूफ-ऑफ-वर्क (Proof-of-work) या नेटवर्कचा वापर केला जातो. प्रूफ-ऑफ-वर्क ही सिस्टिम कोणतंही कॉम्प्युटराईज् काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरते. पण यामुळे सुरक्षित व्यवहार होतात. प्रूफ-ऑफ-वर्क ही प्रणाली संगणकीय शास्त्रज्ञ हॉल फिनी (Hal Finney, Computer Scientist) यांनी 2004 मध्ये सर्वप्रथम डिजिटल कॅश सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली होती. त्यानंतर या प्रणालीचा वापर 2009 मध्ये नाकामोटो यांनी बिटकॉईन बनवण्यासाठी केला. याबदल्यात हॉल फिनी यांना काही बिटकॉईन (Bitcoin) उपहार म्हणून देण्यात आले होते. आज अनेक क्रिप्टोकरन्सीज प्रूफ-ऑफ-वर्क सिस्टिम वापरतात.

इथेरिअमच्या विलीनीकरणानंतर अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सीज्वर विलीनीकरणाचा दबाव निर्माण झाला आहे, असे लॅब्रेस ऑस्ट्रेलियन ब्लॉकचेन डेव्हलपमेंट एजन्सीचे संस्थापक आणि सीईओ लॅचलन फ्रीनी (Lachlan Feeney is the founder and CEO of Labrys) यांनी सांगितले.

डॉजकॉईनदेखील विलीनीकरणाचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर, 2021 मध्ये दिलेल्या विलीनीकरणाच्या इशाऱ्यानंतर आता सप्टेंबर, 2022 मध्ये पुन्हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव इथेरिअमचे सह-संस्थापक विटालिक बुटेरिन (Vitalik Buterin) यांनी मांडला आहे, जे डॉजकॉईनचे सल्लागारदेखील आहेत. 

डॉजकॉईनच्या या निर्णयाचे लोकांनी कौतुक ही केले आणि त्याचबरोबर टीका ही केली. मूलत: डॉजकॉईनची निर्मिती क्रिप्टोकरन्सी मार्केटवर केलेला एक विनोद होता. हाच विनोद आज एवढा मोठा झालेला पाहून अनेकांनी त्यावरही टीका केली.