Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोच्या(Auto Expo) या दोन दिवसात देशातील आणि विदेशातील अनेक कंपन्यांनी त्यांचे नवनवीन मॉडेल्स(Models) लाँच केले आहेत. पहिला दिवस टाटा(Tata) आणि मारुती(Maruti) या कंपन्यांनी गाजविला. याशिवाय एमजीने(MG) देखील ईव्ही आणि नवीन हॅरिअर लाँच केली. मात्र या सर्व कारवर भारी पडली आहे ती आहे, 'वीर(Veer)' ही इलेक्ट्रोनिक कार. या कारने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. नक्की काय खासियत आहे या कारची चला जाणून घेऊयात.
शत्रूला धडकी भरवणारी 'वीर'
ग्रेटर नोएडा(Greater Noida) येथे ऑटो एक्सपो 2023 सुरू झाला आहे. लोकांना येथे एका पेक्षा एक लक्झरी आणि इलेक्ट्रॉनिक(Electronics) गाड्या बघायला मिळत आहेत. या सर्व गाड्यांबरोबरच लोकांच्या नजरेला पडलेली आणि शत्रूला धडकी भरवणारी 'वीर(Veer)' कार चांगलीच चर्चेत आली आहे. या कारने सर्वांनाचं आकर्षित केले कारण ही इलेक्ट्रोनिक कार सीमेवरच्या शत्रूवर मात करण्याचीही ताकद ठेवते. हिला इलेक्ट्रिक वाहन 'वीर' असे नाव देण्यात आले असून सीमेवरील जंगलातील घुसखोरांपासून ते तस्करी करणाऱ्या शत्रूंपर्यंत ही कार सर्वांनाच धडकी भरवणार आहे. लवकरच ही कार वन विभागाच्याही ताफ्यात सामील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी आहे 'वीर'ची खासियत
- सध्या इंडियन आर्मीमध्येही या गाडीची ट्रायल सुरू आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होणार आहे
- लष्करात वीरची एन्ट्री झाल्यानंतर, सीमेवर लाइट लावण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण हा काससोबत देण्यात आलेल्या नाईट व्हिजन कॅमेऱ्याने रस्ते आणि शत्रू दोघांवरही लक्ष ठेवता येणार असल्याचा दावा केला जात आहे
- ही कार आत्याधुनिक आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन आहे
- एका चार्जवर ही कार 500 किलोमीटरपर्यंत चालते
- एवढेच नाही, तर ही कार 900 मिलीमीटर एवढ्या पाण्यातही चालण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे
- या इलेक्ट्रिक वीरला नाईट व्हिजन कॅमेरेही देण्यात आले असून यामुळे रात्रीच्या वेळी शत्रूवर नजर ठेवणे सोपे जाणार आहेत
- ही कार तब्बल 2.5 टन वजन ओढू शकते, यावरून हिच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला येऊच शकतो
- या कारमध्ये लिफ्ट हुक्स शिवाय, वेपन माउंट देखील पुरविण्यात आले आहे
- थर्मल जिंग कॅमेरा कारमध्ये इंस्टॉल करण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर बॅग्स देखील आहे. त्यामुळेच ही कार आकर्षणाचा केंद्र बनली आहे