Diesel ATM: हल्ली एखादी गोष्ट चमत्कारी घडली तर धक्का बसायला नको. आत्तापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी एटीएम(ATM) पाहिलंय आणि वापरत सुद्धा आहोत. काही दिवसांपूर्वी हैद्राबादमध्ये पहिलं सोन्याचं एटीएम(ATM) सुरु झालं. त्यानंतर आत्ता चक्क एटीएममधून(ATM) डिझेल(Diesel) आणि इथेनॉल(Ethanol) देखील मिळतंय. कधी, कुठे आणि कसं चला जाणून घेऊयात.
मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी करावी लागेल ऑर्डर
आपण प्रत्येकजण पैसे काढण्यासाठी एटीएमचा(ATM) वापर करतो. पण आता एटीएममधून(ATM) डिझेल(Diesel) आणि इथेनॉल(Ethanol) देखील मिळणार आहे. विश्वास बसत नाहीये, पण हे खरं आहे. सध्या दिल्लीमधील ग्रेटर नोयडामध्ये ऑटो एक्सो(Auto Expo २०२३) सुरू आहे. यादरम्यान डिझेल एटीएम(ATM) असणारी व्हॅन सादर करण्यात आली. त्यामुळेच सध्या या व्हॅनची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हॅनच्या मदतीने ग्राहकांना ऑर्डर देता येणार आहे आणि गाडीमध्ये डिझेल भरता येणे शक्य होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅप्लिकेशनवरून(Mobile Application) ऑर्डर द्यावी लागेल. त्यानंतर ही डिझेल व्हॅन तुमच्या घरी येऊन तुमच्या गाडीत डिझेल भरून देणार आहे.
280 युनिट डिझेल एटीएम तैनात
तुम्ही ऑनलाईन(Online) इंधनाची मागणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे वाहन तुमच्या घरी येऊन डिझेल भरणार आहे. सध्याच्या घडीला डिझेल आणि इथेनॉलसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ATM मुळे ग्राहकांची भेसळयुक्त डिझेल आणि इंधन चोरीपासून सुटका होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांना शुद्ध इंधनाचा पुरवठा होईल. हे डिझेल एटीएम(ATM) सध्या काश्मीर(Kashmir) आणि कन्याकुमारी(Kanyakumari) दरम्यान सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी 280 युनिट डिझेल एटीएम(ATM) काम करत असून, यामध्ये 1,000 ते 2,000 लिटर साठवणुक क्षमता आहे आणि 6,000 लिटर क्षमतेचे ट्रकही उपलब्ध होणार आहेत. आणखी एक कौतुकाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पंपावरील दरामध्येच इंधन विकत घेता येणार आहे. इंधनपंपाची सुविधा नसलेल्या अनेक भागात हे एटीएम(ATM) सहज पोहोचून वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे.