IDBI Bank: पैसा सुरक्षित राहावा म्हणून लोक एक एक रुपया जोडून बँकेत ठेवतात. आपले पैसे सुरक्षिती आहेत या एकाच गोष्टीवर निर्धास्त राहून लोक आरामाची झोप घेतात. पण बँकेच्या कर्मचाऱ्याकडूनच तुम्हाला चुना लावला गेला तर? असाच एक धक्कादायक प्रकार सरकारी आयडीबीआय बँकेत(IDBI Bank) घडल्याचे उघडकीस आले आहे. यावेळी बँकेच्या मॅनेजरनेच(Bank Manager) ग्राहकांना चुना लावला आहे. आयडीबीआय बँकेतून पैसे गायब झाल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. नेमका हा प्रकार काय आहे, चला जाणून घेऊयात.
नेमका प्रकार काय?
आयडीबीआय बँकेचा(IDBI Bank) 34 वर्षीय रिलेशनशिप मॅनेजरने(Relationship Manager) अनेकांच्या खात्यातून गुपचूप पैसे काढले असल्याचे समोर आले आहे. हे पैसे थोडे थोडके नसून तब्ब्ल 4.92 कोटी रुपये आहेत. मॅनेजरची पोस्टिंग आयडीबीआय बँकेच्या(IDBI Bank) मिशन रोडवरील ब्रँचमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता तिच्याकडून 23 लाख रुपयांचे एलआयसी बाँड(LIC Bond) आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला कॉम्प्युटर(Computer) जप्त करण्यात आले आहे. या आरोपीचे नाव साजिला(Sajila) असून आरोपीने 23 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यातील 4.92 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. चोरण्यात आलेला सर्व पैसा एलआयसी बाँडमध्ये आरोपीने गुंतवला होता.
शाखा प्रमुखाची सावधानगिरी आली कामी
आयडीबीआय बँकेचे(IDBI Bank) उप शाखाप्रमुख संगमेश्वर(Sangameshwar) यांना या प्रकरणाचा सुगावा लागताच त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात लगेचच तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरूकेल्यानंतर उघडकीस आले की, बँक मॅनेजरनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले.आरोपी साजिलाने बंगळुरूच्या गांधीनगर ब्राँचमध्ये काम करताना ग्राहकांच्या खात्यातून 4.92 कोटी रुपये गडप केले होते.