Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

Tax-saving for FY23

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

सर्व करदात्यांनी दरवर्षी आयकर रिटर्न (Income Tax Return) भरणे आवश्यक आहे. आयटीआरमध्ये करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील असतो. यामध्ये उत्पन्नावर लागू होणार्‍या कर दायित्वाचाही समावेश आहे, खरेतर करदात्यांनी उत्पन्नावर कर जमा करणे आवश्यक आहे. आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

कर बचत योजनेत गुंतवणूक करा

सरकार आयकर कलम 80C अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर कर कपात करण्यास परवानगी देते. या योजनांमध्ये तुमची बचत गुंतवून तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करदात्यांना कर सवलतीचा लाभ मिळाला आहे. ही योजना तुम्हाला नवीन वर्षात पैसे वाचवण्यासही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि 5 किंवा अधिक कार्यकाळ असलेल्या मुदत ठेवी (FDs) योजनांवर कर कपातीचा लाभ मिळवू शकता. कर तज्ज्ञांच्या मते, या योजनांमध्ये तुमची बचत गुंतवून तुम्ही लागू अटींनुसार कर सवलतीचा दावा करू शकता. तसेच, यासह तुम्ही दीर्घकाळासाठी स्वत:साठी अधिक निधीची व्यवस्था करू शकता.

योग्य कर व्यवस्था निवडा

सध्या देशात दोन प्रकारची कर व्यवस्था उपलब्ध आहे - जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर व्यवस्था निवडू शकता. दोनपैकी तो पर्याय निवडा जो तुम्हाला अधिक कर बचत देईल. नवीन कर प्रणालीमध्ये कर दर कमी आहे. मात्र करदात्यांना यामध्ये कपातीचा लाभ मिळत नाही. या तुलनेत, जुन्या कर प्रणालीमध्ये कर दर जास्त आहे आणि यामध्ये करदात्यांना आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही करावर कमी खर्च करण्यासाठी नवीन कर प्रणालीची निवड करू शकता. ऑनलाइन आयकर कॅल्क्युलेटर तुम्हाला या कामात मदत करू शकते. या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही नवीन आणि जुन्या कर प्रणालीमधील फरक समजू शकता.

आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करा

नवीन वर्षात कर बचतीसाठी, तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना खरेदी करू शकता. असे केल्याने, तुम्ही कलम 80D अंतर्गत विमा योजनेसाठी प्रीमियम भरण्यासाठी 25,000 हजार रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. ज्येष्ठ नागरिक आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत 50,000 पर्यंत कर सूट मागू शकतात. तुम्ही तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी करता तेव्हा, असे करून तुम्ही 50000 रुपयांचा अतिरिक्त कर वाचवू शकता.

गृहकर्जावर कर बचतीचा लाभ घ्या

तुम्ही बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घेतले असल्यास, तुम्ही नियमांनुसार तुमच्या कर्जावरील व्याज आणि कर्जाच्या रकमेवर कर कपातीचा दावा करण्यास पात्र आहात. आयकराच्या कलम 24 अंतर्गत, गृहकर्जाच्या व्याजावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची कर कपात उपलब्ध आहे आणि कलम 80C अंतर्गत, गृहकर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कर कपात उपलब्ध आहे.

वेळेवर आयटीआर फाइल करा

दरवर्षी एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला 31 जुलै रोजी किंवा आयकर विभागाने निश्चित केलेल्या तारखेपूर्वी आयटीआर भरावा लागतो. ती दाखल करताना चूक झाल्यास अटींसह दंड भरावा लागतो.