• 02 Oct, 2022 09:10

टाटा कंपनी 10 लाखांत इलेक्ट्रिक कार आणणार!

TATA Tigor EV Car

Cheapest Electric Car : टाटा समुहातील टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Car) करणार आहे. टाटाच्या सध्या 40 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कार धावत आहेत. तर येत्या काळात टाटा मोटर्स 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

टाटा समुहातील टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी ही भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) निर्मिती करणारी कंपनी आहे. येत्या काळात टाटा मोटर्सची भारतीय बाजारपेठेवरील पकड आणखी घट्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कंपनीने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Car) करणार आहे.

सध्याच्या इंडियन कार मार्केटचा आढावा घेतला तर TATA Tigor ही सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) मानली जाते. त्याची बाजारातील किंमत 12.49 लाख रुपये (Electric Car Price) आहे. तर मार्केटमधील इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारची (High Range Electric Car) किंमत भरपूर आहे. ह्युडाई आणि किआ (Hyundai & Kia) यासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, भारतातील छोट्या गाड्यांची लिडर मानली जाणारी कंपनी मारुती सुझुकी (Leader in the small car market in India) कंपनीने 10 लाखांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक कार आणणं अवघड असल्याचं म्हटलंय. कंपनी 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणण्याचा विचार करत आहे.

टाटा समुहाने (Tata Group) मात्र हे आव्हान पेलण्याच्या तयारीत आहे. टाटा ग्रुपचं असं म्हणणं आहे की, टाटाची Tiago EV लॉन्च झाल्यानंतर ही कार फक्त टाटा मोटर्सच्याच नाही तर संपूर्ण देशातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) असेल. या कारची बॅटरी क्षमता, गाडीची पॉवर आणि नेमकी किंमत अशा गोष्टी कारच्या लॉन्चिंगच्यावेळी जाहीर केल्या जातील असं कंपनीने म्हटलं आहे. हे कंपनीचे तिसरे Tiago EV मॉडेल असेल आणि 2026 पर्यंत लॉन्च केल्या जाणाऱ्या 10 मॉडेलपैकी एक असणार आहे.

Tiago या मॉडेल्या पेट्रोल कारची बेसिक किंमत 5.4 लाख रुपये आहे. वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण पेट्रोल कारच्या दुप्पट इलेक्ट्रिक कारची किंमत असते. त्यामुळे टाटा मोटर्स Tiago च्या नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांच्या आसपास असू शकते. एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान टाटा मोटर्सने 17,150 इलेक्ट्रिक कारची विक्री केली. कंपनीने या वर्षात इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करून सुमारे 50 हजार इलेक्ट्रिक कारच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले.

टाटा 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार

टाटाच्या सध्या 40 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कार धावत आहेत. याच अनुषंगाने टाटाने वर्षाच्या सुरूवातीलाच इलेक्ट्रिक कारमधील आपले लक्ष्य जाहीर केले होते. तसेच टाटाने येत्या काळात 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहोत, अशी माहिती टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी दिली.

टाटा मोटर्सने पुढील 5 वर्षांसाठी इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी 15 हजार कोटींची गुंतवणूक केली.

Image Source: https://tigorev.tatamotors.com/