Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इलेक्ट्रिक कार Vs सोलर कार! जाणून घ्या फरक?

solar vs ev

इलेक्ट्रिक (Electric), हायब्रीड (Hybrid) किंवा सौर-ऊर्जेवर (Solar Energy) चालणारी वाहने ही एनर्जी मॉडेल म्हणून नावारूपास येऊ लागली आहेत. या नवीन वाहनांमुळे वायू प्रदूषण, इंधनाची कमतरता आदी समस्यांचे निराकारण होण्यास मदत होऊ लागली आहे.

पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचा साठा कमी होत असल्याने सर्व देश ऊर्जा निर्मितीसाठी विविध पर्यायांचा वापर करू लागले आहेत. तसेच ऊर्जा संवर्धनासाठी विशेष माहीम राबवली जात आहे. जागतिक ऊर्जा धोरणाच्या माध्यमातून प्रदूषण उत्सर्जन कमी करणे (reduction of polluting emissions), नूतनीकरणयोग्य संसाधनांचा वापर करणे (use of renewable resources) आणि ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ (increase energy efficiency) करण्यावर भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून भविष्यातील इंधनाची समस्या लक्षात घेऊन इलेक्ट्रिक कारची (Electric Car) निर्मिती करण्यात आली. 

आता त्याही पुढे जात सौर-ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने (Solar Car) तयार केली जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सौर ऊर्जेचा वापर हा वाहननिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण यामुळे इंधनाच्या बचती बरोबरच, वायू प्रदूषण टाळून, नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेद्वारे वाहने चार्जिंग करून निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे. इलेक्ट्रिक, हायब्रीड किंवा सौर-ऊर्जेवर चालणारी वाहने ही एनर्जी मॉडेल म्हणून ठरू शकतात. यामुळे वायू प्रदूषण, इंधनाची कमतरता अशा अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात.

इलेक्ट्रिक कार म्हणजे काय? What is Electric Car?

इलेक्ट्रिक वाहन, हे असे एक वाहन आहे जे इंजिन सुरू करण्यासाठी इंधनाचा वापर न करता, त्याऐवजी एक किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक वाहने ही आधुनिक इलेक्ट्रिक प्रेरक शक्तीवर आधारित विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक वाहन आहे; ज्यात इलेक्ट्रिक मोटर, पॉवर कन्व्हर्टर आणि ऊर्जा स्त्रोतांचा वापर केला आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील हा एक आविष्कर आहे. ज्यात कला आणि अभियांत्रिकीचे कौशल्य वापरून आधुनिक वाहन तयार करण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक वाहनामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्र्टॉनिक्स सिस्टमसोबत माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इंधनावर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रदूषणात भर घालण्याचे काम करत आहेत. परिणामी निसर्गाचा समतोल ढासळत आहे; प्राणी-पशू आणि माणसांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरित परिणाम होत आहे. त्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने ऊर्जा कार्यक्षम आहेत. या वाहनांमधून कोणत्याही प्रकारचा वायु वातावरणात सोडला जात नाही आणि इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत कमी आवाज करतात. यामुळे वायु किंवा ध्वनी असे कोणतेच प्रदूषण होत नाही. इलेक्ट्रिसीटी ही पाणी, हवा, सौर-ऊर्जा आणि बायोमास यांसारख्या अक्षय स्रोतांद्वारे (renewable sources) तयार करता येते.


सोलर कार म्हणजे काय? What is Solar Car?

सोलर कार ही प्रामुख्याने इलेक्ट्रिक कारच असते. जी पूर्णपणे किंवा अंशतः सौर ऊर्जेद्वारे चालविली जाते. सोलर कार हे सौर-ऊर्जा आणि इलेक्ट्रिक कार यांचं एक चांगलं कॉम्बिनेशन आहे, असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ही दोन तंत्रज्ञानं एकत्रित आल्यामुळे त्याचा परिणाण अधिक कार्यशील झाला आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीमध्ये सोलर पॅनेलद्वारे तयार करण्यात आलेली नैसर्गिक ऊर्जा साठवली जाऊ शकते. सोलर कारमध्ये सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकाशविद्युतचालक बॅटरींचा (photovoltaic cells) वापर करतात. सोलर तंत्रज्ञान हे पारंपारिक इंधनावर आधारित ऊर्जा निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक फायदेशीर आहे. कारण ही मोफत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे वायु किंवा ध्वनी असे कोणतेही प्रदूषण होत नाही. इलेक्ट्रिक पॉवर ग्रिडमध्ये वापरता येणारी इलेक्ट्रिक पॉवर तयार करण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी चार्जिंग स्टेशन्स बांधणे हा एक पर्याय ठरू शकतो आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहने सौर आणि पवन ऊर्जेद्वारे (Solar and Wind Energy) चालवता येऊ शकतात.

सोलर कार आणि इलेक्ट्रिक कारमधील फरक

Electric Solar Vehicle

पॉवर (Power)

इलेक्ट्रिक वाहन, हे असे एक वाहन आहे जे इंजिन सुरू करण्यासाठी इंधनाचा वापर न करता, त्याऐवजी एक किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर केला जातो. मोबाईल फोन सुरू राहण्यासाठी जशी बॅटरी चार्ज केली जाते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक गाडीची चाके फिरवणार्‍या मोटरला चार्ज करावे लागते. सौरऊर्जेवर चालणारी वाहने ही पूर्णपणे किंवा अंशतः थेट सौरऊर्जेद्वारे चालणारी इलेक्ट्रिक वाहने आहेत. सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रकाशविद्युतचालक बॅटरींचा (photovoltaic cells) वापर करतात.

इंजिनाची कार्यपद्धती (workings of the engine)

इलेक्ट्रिक वाहने विजेवर चालतात; जी मोठ्या बॅटरीमध्ये साठवली जाते. ही साठवलेली वीज इलेक्ट्रिक मोटरला पॉवर पुरवते. आणि त्यातून इंजिन कार्यरत होतं. तर सर्वसाधारण वाहनांमध्ये इंधन आणि वायुचे मिश्रण जाळून ऊर्जा निर्माण केली जाते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इंजिनाऐवजी इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते, डीसी (DC) बॅटरीपासून एसी (AC) मध्ये पॉवर रूपांतरित करते. तर सोलर कार, सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रकाशविद्युतचालक बॅटरींचा (photovoltaic cells) वापर करतात. ज्याचा वापर वाहनाच्या सर्व भागांसाठी किंवा इतर कार्यासाठी केला जातो.

कार्यक्षमता (Efficiency)

इलेक्ट्रिक आणि सौरऊर्जेवर चालणारी वाहने ही सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या कारसाठी एक चांगला पर्याय आहेत. कारण या वाहनांमधून वायु प्रदूषण होत नाही; जे ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण मानलं जातं. इलेक्ट्रिक वाहने ही इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा अधिक ऊर्जा कार्यक्षम आहेत. तसेच या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण कमी होते. सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनेही अशीच आहेत. पण इंधनावर चालणाऱ्या कारचे सोलर कारमध्ये रूपांतर करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे.

सोलर कार ही पूर्णत: गाडीच्या इलेक्ट्रिक सिस्टिमवर अवलंबून असते. जी प्रकाशविद्युतचालक बॅटरींचा (photovoltaic cells) वापर करून वीज नियंत्रित ठेवते. इलेक्ट्रिक कार या पूर्णपणे सोलर बॅटरीद्वारे साठवलेल्या ऊर्जेद्वारे चालवता येऊ शकते. पण सोलर कार चालवण्यासाठी थेट सौर ऊर्जेद्वारे पुरेशी पॉवर जमा करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे.