Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Advantages And Disadvantages of Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेताय, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Joint Home Loan , Home Loan , EMI, Bank Loan, Co Owner

Advantages And Disadvantages of Joint Home Loan : आपण सह-अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीची क्षमता यांचा आधार घेऊन शेवटपर्यंत कर्जाची पूर्तता करू शकू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा जोडीदार, आई-वडील आणि मुलांसोबत संयुक्त कर्ज घेऊ शकता. काही बँका भावांना मालमत्तेचे सहमालक असल्यास संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करण्याची परवानगी देऊ शकतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला घर खरेदीसाठी पैसे कमी पडतात किंवा बँकेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो. तेव्हा एक पर्याय जो मनात येऊ शकतो, तो म्हणजे संयुक्त गृहकर्ज. आपले पहिले घर खरेदी करण्यासाठी खूप आर्थिक प्रयत्न करावे लागतात. आपण गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला डाउन पेमेंटसाठी पैशांची आवश्यकता असते. सहसा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला घरासाठी पैसे कमी पडतात किंवा कर्जाबाबत पात्रतेचे निकष पूर्ण करण्यास तो असमर्थ ठरतो, तेव्हा एक पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे संयुक्त गृहकर्ज (Joint Home loan).

संयुक्तपणे गृहकर्ज घेताना एखादी व्यक्ती आपली कर्ज घेण्याची क्षमता वाढवू शकतो. आपण कुटुंबातील सदस्यांसह किंवा जवळच्या नातेवाईकांसह जसे की पालक, जोडीदार, पुरुष व मूल, अविवाहित महिला व मूल किंवा एकत्र राहणारे भाऊ यांच्यासह संयुक्तपणे गृहकर्ज (Joint Home loan) घेऊ शकता. यासाठी मालमत्तेत सहमालक असणे बंधनकारक नाही. मात्र, कर लाभासाठी सह-कर्जदार हाही त्या मालमत्तेचा सहमालक असणे आवश्यक आहे, जेणेकरून लागू कर लाभ (applicable for tax benefits) मिळण्यास पात्र होईल. बँकबझार डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदिल शेट्टी म्हणतात की, "संयुक्त गृहकर्जामुळे तुमची कर्ज पात्रता वाढण्यास आणि सर्व सह-कर्जदारांना आयकराचा (Income Tax) लाभ मिळण्यास मदत होते. 

आपण सह-अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीची क्षमता यांचा आधार घेऊन शेवटपर्यंत कर्जाची पूर्तता करू शकू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा जोडीदार, आई-वडील आणि मुलांसोबत संयुक्त कर्ज घेऊ शकता. काही बँका भावांना मालमत्तेचे सहमालक असल्यास संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करण्याची परवानगी देऊ शकतात. पण, एकत्र राहणारे मित्र, बहिणी किंवा अविवाहित जोडप्यांना संयुक्त गृहकर्ज मिळवताना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो."

संयुक्त गृहकर्ज घेण्याचे फायदे (Advantages of Taking A Joint Home Loan)

  • आपल्या गृहकर्जात सह-अर्जदार जोडून, आपण बँकांकडून अधिक निधी मिळविण्यासाठी आपली पात्रता वाढवू शकता. वित्तीय संस्थांकडून (बँकांकडून) निधी मिळविण्यात अयशस्वी होणे हे कमी क्रेडिट स्कोअर, अपुरे उत्पन्न यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. पण गृहकर्जासाठी तुमचा सह-अर्जदार तुम्हाला गृहकर्जासाठी लागणारा निधी मिळवून देण्यास मदतगार ठरू शकतो. संयुक्त गृहकर्जदाराची पुरेशी कमाई किंवा हाय क्रेडिट स्कोअर मुळे गृहकर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते.
  • संयुक्त गृहकर्जात जर सह-कर्जदारही मालमत्तेचा सहमालक असेल, तर तो/ती निर्धारित मर्यादेत u/s 24 आणि u/s 80 C या कर वजावटीचे (Tax Deduction) लाभ घेण्यासही पात्र ठरू शकतो.  प्राप्तिकर कायद्यानुसार संयुक्त कर्जदारांना प्रत्येकी दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपयांचा कर लाभ म्हणजेच एकत्रित 7 लाख रुपयांचा कर लाभ मिळू शकतो.  
  • गृहकर्जातील कर्जदारांपैकी एक महिला असेल तर काही बँका कमी व्याजदराने गृहकर्ज देऊ करतात, त्यामुळे तुमच्या महिला सदस्याचा समावेश करून गृहकर्जाचा ईएमआय कमी करू शकता.

संयुक्त गृहकर्ज घेण्याचे तोटे (Disadvantages of taking a joint home loan)

  • सर्व आर्थिक बाबींमध्ये काही फायदे आणि तोटे असतात. त्याचप्रमाणे संयुक्त गृहकर्जातही काही त्रुटी आहेत. उदाहरणार्थ, जर एखादा सह-कर्जदार गृहकर्जाचा ईएमआय वेळेवर फेडण्यात अपयशी ठरला तर दोन्ही कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होतो.
  • सह-कर्जदारांमध्ये वाद असल्यास, त्याचा परिणाम एखाद्या कर्जदाराने पैसे न देणे आणि अशा प्रकारे परतफेड चुकवणे असा परिणाम होऊ शकतो. जर हे कर्ज पती-पत्नीने एकत्र घेतले असेल आणि नंतर त्यांचा घटस्फोट होणार असेल तर या बाबतीत जॉइंट गृहकर्जाच्या परतफेडीमध्ये बराच कालावधी लागू शकतो.
  • अनेकदा कर्जाचा आर्थिक दबाव कमी करण्यासाठी सह-अर्जदार जोडला जातो, परंतु जर तो/ ती वर्षानुवर्षे कर्ज फेडण्यात अपयशी ठरला, तर संपूर्ण कर्जाची रक्कम आपली जबाबदारी बनते.