• 02 Oct, 2022 08:24

गृहकर्ज होणार नाही डोईजड कारण यावर मिळतात अनेक फायदे

Home Loan

Home Loan:अनेकांसाठी स्वतःचे घर असणे हे आयुष्यभराचे सत्यात उतरणारे ध्येय आहे परंतु ते प्रचंड महागडे देखील आहे. ग्राहकाच्या बजेटमध्ये स्वप्नातील घर बसवण्याची सर्वांत महत्त्वाची पद्धत म्हणजे गृहकर्ज घेणे ही आहे. गृहकर्ज घेतल्यास कर्जदाराला अनेक करलाभ देखील होतात.

स्थिरस्थावर होण्यासाठी घर खरेदी करणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्त संस्थांकडून गृहकर्जे दिली जातात. गृहकर्जांचा वापर नवीन घर, अपार्टमेंट किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी आणि जुनी मालमत्ता नूतनीकृत, विस्तारित आणि पुनर्स्थापित करण्यासाठी करणे शक्य आहे. त्यामुळे एखादे गृहकर्ज तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारे मदत करते हे जाणून घेऊया.

कर संदर्भातील फायदे (Tax Benefits on Home Loan)

गृहकर्ज घेण्याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करत असलेल्या मुद्दलाच्या रकमेवर आणि व्याजावर तुम्ही प्राप्तीकरातील वजावट मिळवू शकता. तुम्ही कलम 80C अंतर्गत मुद्दल रकमेच्या परताव्यावर 1.5 लाख रुपयांपर्यंत, कलम 24B अंतर्गत व्याज रकमेच्या परताव्यावर 2 लाख रुपये, कलम 80EE आणि 80EEA अंतर्गत रकमेच्या प्रदानावर 2 लाख रुपयांपर्यंत आणि कलम 80सी अंतर्गत मुद्रांक शुल्काच्या खर्चावर 1.5 लाख रुपयांपर्यंत दावा करू शकता. तुम्ही कलम 24B अंतर्गत व्याजाच्या परताव्यावर 2 लाख रुपयांपर्यंत, कलम 80EE आणि 80EEअंतर्गत विशिष्ट परिस्थितीत व्याजाच्या परताव्यावर 2 लाख रुपयांपर्यंत आणि अधिक दावा करू शकता.

भूखंडाची सखोल चौकशी

तुम्ही बँकेच्या माध्यमातून घर खरेदी करता तेव्हा बँक मालमत्तेची सखोल चौकशी करेल आणि तुम्ही देत असलेली कोणतीही कागदपत्रे कायदेशीर आहेत की नाहीत हे ठरवेल. बँकेकडून केली जाणारी ही सखोल चौकशी तुम्ही एखाद्या घोटाळ्याला बळी पडण्याची शक्यता कमी करेल. बँकेने मालमत्ता प्राधिकृत केली आहे असे गृहित धरल्यास तुम्ही आणि तुमचे घर चांगल्या हातात आहात असे मानता येईल.

कर्ज परताव्याचा दीर्घ कालावधी

इतर प्रकारच्या कर्जांच्या विरुद्ध गृहकर्जांचा परतावा कालावधी दीर्घकालीन असतो. हा अनेकदा 25-30 वर्षे असतो.हे एखादे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या रकमेमुळे घडते. जास्त विस्तारित कालावधीवर कर्जाची रक्कम आणि लागू असलेला व्याजदर विस्तारित केल्यामुळे मासिक हप्ते कमी होतात आणि कर्जदाराचा भार कमी होतो.

आधी परतावा केल्यास दंड नाही

तुम्ही चालू दराने गृहकर्ज घेता तेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील तेव्हा तुम्ही तुमच्या हातात असलेल्या पैशांचा भरणा करून कर्जाचा आधीच परतावा करू शकता. त्यासाठी कोणताही प्रीपेमेंट दंड किंवा व्याजदर लागू होत नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या नियत कर्ज कालावधीपेक्षा खूप आधी गृहकर्जाचा परतावा करता येईल.

शिल्लक रक्कम हस्तांतरणासाठी सुविधा

एका बँकेकडून तुमचे गृहकर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय विविध घटकांवर आधारित असू शकतो. जसे व्याजदर, शुल्क आणि ग्राहक सेवा अनुभव याची पडताळणी करा आणि त्यानुसार होम लोन हस्तांतर करण्याबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकता.