Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Raghuram Rajan: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा गंभीर इशारा, बँकिंग क्षेत्र कडेलोटाच्या उंबरठ्यावर

Raghuram Rajan: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ राहिलेल्या राजन यांनी 2008 मधील जागतिक मंदीचे सुमारे दशकभर आधीच भाकीत केले होते. आताही राजन यांनी जागतिक पातळीवरील बँकिंग क्षेत्राबाबत महत्वाचे विधान केले आहे. राजन म्हणाले की बँकिंग क्षेत्रात सहजपणे उपलब्ध होणारी कर्जे आणि प्रचंड प्रमाणात असलेली रोकड मुबलकता या दोन गोष्टी भविष्यातील संकटास कारणीभूत ठरु शकतात.

Read More

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Read More

UBS to buy Credit Suisse: क्रेडिट स्वीसला जीवनदान! UBS बँकेत विलीन होणार, स्वित्झर्लंड सरकारचा मोठा निर्णय

UBS to buy Credit Suisse:आर्थिक संकटात सापडलेली स्वित्झर्लंडमधील आघाडीची बँक क्रेडिट स्वीसला जीवनदान मिळाले आहे. जागतिक पातळीवरील मोठ्या बँकांपैकी एक असलेली UBS बँक क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या विशेष समितीने यासंदर्भात यूबीएस ग्रुपला निर्देश दिले. क्रेडिट स्वीस ही यूबीएस बँकेत विलीन होणार असल्याने बँकिंग क्षेत्रावरचे आर्थिक संकट तूर्त टळले आहे.

Read More