Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UBS to buy Credit Suisse: क्रेडिट स्वीसला जीवनदान! UBS बँकेत विलीन होणार, स्वित्झर्लंड सरकारचा मोठा निर्णय

Credit Suisse Bank

Image Source : www.twitter.com

UBS to buy Credit Suisse:आर्थिक संकटात सापडलेली स्वित्झर्लंडमधील आघाडीची बँक क्रेडिट स्वीसला जीवनदान मिळाले आहे. जागतिक पातळीवरील मोठ्या बँकांपैकी एक असलेली UBS बँक क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या विशेष समितीने यासंदर्भात यूबीएस ग्रुपला निर्देश दिले. क्रेडिट स्वीस ही यूबीएस बँकेत विलीन होणार असल्याने बँकिंग क्षेत्रावरचे आर्थिक संकट तूर्त टळले आहे.

आर्थिक संकटात सापडलेली स्वित्झर्लंडमधील आघाडीची बँक क्रेडिट स्वीसला जीवनदान मिळाले आहे. जागतिक पातळीवरील मोठ्या बँकांपैकी एक असलेली UBS बँक क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या विशेष समितीने यासंदर्भात यूबीएस ग्रुपला निर्देश दिले. क्रेडिट स्वीस ही यूबीएस बँकेत विलीन होणार असल्याने बँकिंग क्षेत्रावरचे आर्थिक संकट तूर्त टळले आहे. (UBS to Buy Credit Suisse After Swiss Authority Gives Directives) 

क्रेडिट स्वीस बँकेने आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याचे जाहीर केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्याआधीच्या आठवड्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बंद झाल्या होत्या. त्यातच क्रेडिट स्वीसला सौदी नॅशनल बँक या बड्या गुंतवणूकदाराने आणखी अर्थसहाय्य करण्यास नकार दिल्याने क्रेडिट स्वीसची कोंडी झाली होती. क्रेडिट स्वीसला तारण्यासाठी आता यूबीएस समूह पुढे आला आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या निर्देशानंतर यूबीएसने क्रेडिट स्वीसचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार यूबीएस क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्सला खरेदी करणार आहे.

क्रेडिट स्वीस आणि यूबीएस या दोन बँकांमधील करार हा जागतिक पातळीवरील वित्तीय सेवा क्षेत्रातील अनिश्चितता दूर करण्यास फायदेशीर ठरेल, असे मत स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अॅलन बर्सेट यांनी व्यक्त केले. क्रेडिट स्वीस कोसळली असती तर त्याची मोठी किंमत जागतिक अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली असती, असे त्यांनी सांगितले. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना क्रेडिट स्वीसचे चेअरमन अॅक्सेल लेहमन यांनी हा निर्णय क्रेडिट स्वीससाठी कलाटणी देणारा ठरेल, असे म्हटले आहे. क्रेडिट स्वीससाठी खूपच आव्हानात्मक दिवस होता. हा विषय केवळ स्वित्झर्लंडपुरता मर्यादित नाही तर वर्ल्ड फायनान्शिअल  मार्केटसाठी खूपच महत्वाचा होता. यूबीएसने खरेदीचा निर्यण घेतल्याने क्रेडिट स्वीस वाचली आहे. आता क्रेडिट स्वीसमधील जवळपास 50000 कर्मचाऱ्यांच्या भविष्याची चिंता दूर झाली असे त्यांनी सांगितले.  

रोकड चणचण दूर करण्यासाठी स्वीस नॅशनल बँकेकडून 50 बिलियन स्वीस फ्रॅंक (54 बिलियन डॉलर्स) कर्ज घेण्याचा पर्याय क्रेडिट स्वीसने गेल्या आठवड्यात गुरुवारी जारी केला होता. यावर स्वीस नॅशनल बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. बँकिंग क्षेत्रातील महत्वाच्या बँकांना तातडीने अतिरिक्त अर्थसहाय्य (बेलआऊट) करण्यास तयार असल्याचे स्वीस नॅशनल बँकेने म्हटले होते. या संकटावर तातडीने तोडगा काढण्यासाठी स्वीस सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. 2008 मध्ये लेहमन ब्रर्दस क्रॅश झाल्यानंतर जगभर मंदीचा तडाखा बसला होता. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी स्वित्झर्लंड सरकार, फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि यूएस ट्रेझरी या संस्थांनी क्रेडिट स्वीस प्रकरणावर लक्ष केंद्रित केले होते.

क्रेडिट स्वीसला यूबीएसमध्ये विलीन करणे ही एक चांगली संधी म्हणून समजतो, अशी भावना यूबीएसचे चेअरमन कोल्म केल्हर यांनी व्यक्ती केली. वर्ल्ड फायनान्शिअल मार्केटमध्ये क्रेडिट स्वीसची एक वेगळी प्रतिमा आहे. विलीनीकरणानंतर दोन्ही बँकांची एकूण मालमत्ता 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल, असे त्यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड सरकारने युद्धपातळीवर घेतला मोठा निर्णय

क्रेडिट स्वीससाठी स्वित्झर्लंड सरकारने युद्धपातळीवर धाडसी निर्णय घेतला. क्रेडिट स्वीसच्या पुनरुज्जीवनासाठी स्वीस सरकारने सात सदस्यांची कमिटी स्थापन केली होती. त्यात स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अॅलन बर्सेट यांचाही समावेश होता. क्रेडिट स्वीसला यूबीएसमध्ये विलीन करण्याचा धाडसी निर्णय या समितीने घेतला. विशेष म्हणजे हा निर्णय बँकेच्या समभागधारकांच्या मंजुरीशिवाय संमत करण्यात आला.

News Source : AP, Economics Times