SBI Retired Officer Recruitment 2022: तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल तर मग स्टेट बँक ऑफ इंडियानं(SBI) एक चांगली संधी आणली आहे. निवृत्त अधिकाऱ्यांच्या बंपर पदांसाठी ही भरती निघाली असून या रिक्त जागा विशेषतः सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहेत. या भरतीमध्ये एकूण 1438 पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) अधिकृत वेबसाईटला sbi.co.in भेट द्यावी लागेल.
Table of contents [Show]
या भरतीसाठी पात्रता काय असेल?
- वयाच्या 60व्या वर्षी बँकेतून निवृत्त झालेले कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात
- स्टेट बँक ऑफ इंडियाचे(SBI) सेवानिवृत्त अधिकारी या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेची गरज नाही
- उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि काम करण्याची क्षमता असावी
- पदानुसार, आवश्यक कौशल्य आणि योग्यता देखील उमेदवारामध्ये असणे गरजेचे आहे
- भारतीय स्टेंट बँकेतील या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही
- सुरुवातीला त्यांना शॉर्टलिस्ट करून त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल
- मुलाखतीवर आधारित 100 गुणांच्या आधारे उमेदवारांचे मुल्यांकन केले जाईल
- उमेदवाराचे पासिंग मार्क्स बँक ठरवणार असून त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल
- एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असतील तर तरुण उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल
वेतन किती असेल?
- निवड झाल्यावर उमेदवाराला पदानुसार वेतन मिळेल
- लिपिक पदासाठी पगार 25,000 रुपये देण्यात येईल
- JMGS – I साठी 35,000 रुपये
- MMGS – II आणि MMGS – III साठी 40,000 रुपये देण्यात येईल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, SBI चे पूर्वीचे सहकारी बँक कर्मचारी या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.