Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investing in India : फक्त 16% कुटुंबांना 2023 मध्ये पैशाची गुंतवणूक करावीशी वाटते!

Investment Sentiment

Investing in India : 2022 चा एकूण अनुभव बघता फक्त 16% कुटुंबांची 2023 मध्ये गुंतवणूक करायची तयारी आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कुटुंबांचा पैसा नेमका कुठे खर्च होतोय. आणि कुठल्या गुंतवणुकीवर त्यांना विश्वास वाटतो जाणून घेऊया…

कोरोना उद्रेकामधून (Coronavirus Pandemic) देश हळू हळू सावरतोय तशी लोकांची खर्च करण्याची क्षमता (Expenditure Power) आणि तयारी वाढलेली आहे. कारण, बाजारांमध्ये गर्दी दिसतेय. आणि वस्तू, सेवांची विक्रीही (Sales of Goods & Services) वाढलीय. पण, भारतीय आणि खासकरून ग्रामीण भारतातल्या लोकांची अजून गुंतवणुकीची मानसिकता (Investment Sentiment) तयार झालेली नाही. अॅक्सिस माय इंडिया (Axis My India) ही संस्था दर महिन्याला एक सर्वेक्षण करते. आणि त्यातून कन्झ्युमर सेंटिमेंट इन्डेक्स (Consumer Sentiment Index) तयार करत असते. त्या सर्वेक्षणातून समोर आलेलं वास्तव धक्कादायक आहे.    

74% कुटुंबांना 2023 मध्ये गुंतवणूकच करायची नाहीए . या सर्वेक्षणात 10,019 लोकांनी सहभाग घेतला. आणि यातले 30% लोक शहरातले तर उर्वरित 70% ग्रामीण भारतातले होते. या निर्णयामागे शेअर बाजारातल्या जोखमीची भीती, अलीकडे शेअर बाजारात झालेली घसरण तसंच जागतिक मंदीची भीती ही कारणं असल्याचं सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मनीकंट्रोल वेबसाईटने या अहवालाची सविस्तर माहिती दिली आहे.    

मुलांचं शिक्षण ही प्राथमिकता Child’s Education Top Priority  

आर्थिक गुंतवणूक करणार नसतील तर कुटुंबांचा पैसा नेमका कुठे खर्च होणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही असेल. कुठल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी लोक पैसे राखून ठेवणार आहेत हा प्रश्नही सर्वेक्षणा दरम्यान विचारण्यात आला.    

सगळ्यात जास्त म्हणजे 34% लोकांनी मुलांचं शिक्षण हे पहिलं आर्थिक लक्ष्य असल्याचं सांगितलं. तर त्या खालोखाल 14% लोकांना कुटुंबात लग्न समारंभ करायचा आहे. काहींना स्वत:चं घर घ्यायचं आहे. तर काहींना बिकट काळासाठी पैसे जपून ठेवायचे आहेत.   

financial-needs-of-indian-families.jpg

पण, विशेष म्हणजे यातल्या कुठल्याही आर्थिक उद्दिष्टासाठी त्यांना शेअर बाजार किंवा इतर गुंतणुकीचं साधन सुरक्षित वाटत नाहीए. इतकंच कशाला तर 27% लोकांनी आपल्याला कुठलंही आर्थिक उद्दिष्टं नसल्याचंही सांगितलं.    

गुंतवणूक कुठे करणार? Where Will They Invest?   

केली तर गुंतवणूक कुठे करणार हा प्रश्नही या लोकांना विचारण्यात आला. तेव्हा मात्र 40% लोकांनी म्युच्युअल फंड, विमा, शेअर बाजार आणि सोनं अशी नावं घेतली. 16% लोकांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे.   

where-to-invest-in-2023.jpg

30% लोक असे आहेत ज्यांना एकतर कुठे गुंतवणूक करायची हे ठरवता आलेलं नाही किंवा ते गुंतवणुकीसाठी तयार नाहीत.    

एकूण 9% लोकांनी सांगितलं की नवीन वर्षी त्यांना चांगल्या बचतीच्या सवयी अंगी बाणवून घ्यायच्या आहेत.