2022 वर्षांत देशात कुठल्या बँकेनं सगळ्यात जास्त मुदत ठेवी (Fixed Deposit) ग्राहकांकडून मिळवल्या याची माहिती अलीकडेच जाहीर झाली होती. आणि यामध्ये HDFC बँकेनं सगळ्यात वरचा क्रमांक पटकावला. HDFC बँकेनं ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीतच 13.77 लाख कोटी रुपये मूल्यांच्या मुदत ठेवी जमवण्यात यश मिळवलं. त्यानंतर आता बँकेनं आपल्या काही विशिष्ट मुदतीच्या मुदत ठेवींवरचा व्याज दरही वाढवला आहे. तर कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) या आणखी एका खाजगी बँकेनंही (Private Bank) तेच पाऊल उचचलं आहे. दोन्ही बँकांचे नवे व्याज दर 4 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
HDFC बँकेचे नवीन व्याज दर New Deposit Rates by HDFC Bank
HDFC बँकेनं बदल केलेला व्याज दर हा मोठ्या आकाराच्या मुदत ठेवींमध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर बँक आता 7% (सामान्य ग्राहकांसाठी) आणि 7.75% (वरिष्ट नागरिकांसाठी) दराने व्याज देणार आहे. त्यासाठीची मुदत 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची आहे.
बँकेचे इतर मुदत ठेवींवरचे व्याज दर 4.50 ते 7.00% च्या दरम्यान आहेत. सर्वात कमी व्याज दर 7 ते 29 दिवसांसाठीचा आहे. तिथून पुढे एक ते तीन महिन्यांसाठी वेग वेगळे दर लागू होतील. आणि सहा महिन्यांपासूनच्या मुदतीवर किमान 6% दराने व्याज मिळेल.
कोटक महिंद्रा बँकेचे नवे व्याज दर Fixed Deposit Rates by Kotak
कोटक महिंद्रा बँकेनं दोन कोटी रुपयांच्या खालील मुदत ठेवींसाठी व्याज दरवाढ केली आहे. बँकेच सर्वाधिक व्याज दर 390 दिवस ते दोन वर्षांखालील मुदत ठेवींवर आहे. सामान्य नागरिकांना 7% तर वरिष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याज मिळेल.
याशिवाय इतर मुदत ठेवींवर कोटक महिंद्रा बँक 2.75% ते 7% पर्यंत व्याज देऊ करते. सगळ्यात कमी व्याज दर 7 ते 14 दिवसांसाठीचा आहे. तर एक ते दीड महिन्यांसाठी कोटक महिंद्रा बँक 3.25% व्याजदर देते. आणि एक वर्षांच्या पुढच्या मुदतीसाठी 6% व्याजदर लागू होतो.