Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada Lottery 2023: पुण्यात 5,966 घरांची जम्बो लॉटरी निघणार...

Mhada Lottery 2023

Image Source : www.mhada.gov.in

Mhada Lottery 2023: विजेत्यांना घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर एका दिवसात घराचा ताबा मिळणार आहे.

Mhada Lottery 2023: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडा(MHADA) तुम्हाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहे. पुण्यात 5,966 घरांची जम्बो लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरु होणार असून म्हाडाची संगणकीय सोडत आता 100 टक्के ऑनलाईन(Online) पद्धतीने होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील घरांसाठीही करता येईल अर्ज

पुण्यामध्ये म्हाडाच्या 5966 घरांची जम्बो लॉटरी निघणार असून या घरांसाठी 5 जानेवारीपासून नोंदणीला(Registration) सुरुवात होणार आहे. तर 17 फेब्रुवारीला या घरांची सोडत काढण्यात येईल. यामुळे तुम्हाला पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील(Pimpri Chinchwad) घरांसाठीही अर्ज करता येणार आहे. यामुळे पुणेकरांचे देखील हक्काच्या घरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

सोडतीआधी ही कागदपत्र करावी लागतील जमा

या एका नोंदणीतून तुम्ही सर्वच मंडळांसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सोडतीआधीच तुमच्या सर्व कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यामुळे  सोडत जिंकणाऱ्यांना घराचा ताबाही लवकर लवकर म्हाडाकडून मिळणार आहे. सोडतीआधी अर्जदारांना आधार(Aadhar Card), पॅन(Pan), उत्पन्नाचा(Income Certificate) आणि निवासाचा दाखलाही(Domicile Certificate) सादर करावा लागणार आहे.

100 टक्के ऑनलाईन सोडत

म्हाडाने  राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 (Integrated Housing lottery Management System) ही नवीन संगणकीय सोडत प्रणाली तयार केली आहे. नोंदणी प्रक्रिये दरम्यान अर्जदारास एक युनिक क्रमांक देण्यात येईल ज्याआधारे अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाईल(Profile) नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे लगेच केली जाणार आहे.

असा करा अर्ज

नव्या नियमांनुसार नोंदणी करतानाच अर्जदाराला पॅनकार्ड (Pan card), आधारकार्डसह (Aadhar card) उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. तर, सामाजिक आणि इतर आरक्षित वर्गातील अर्जदारांना  जातीचा दाखला सादर करावा लागणार आहे.

एका दिवसात मिळणार म्हाडाच्या घराचा ताबा

विजेत्यांना घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर एका दिवसात घराचा ताबा मिळणार आहे. दरम्यान सोडतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन(Online) होणार असून, फक्त घराची चावी(Home key) आणि कराराच्या कारणानेच अर्जदारांना म्हाडाच्या कार्यालयात जावे लागणार आहे.