Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Home Lottery: फक्त 6 कागदपत्रं सादर करा आणि म्हाडाचं घर मिळावा

MHADA Home Lottery

Image Source : www.magicbricks.com

MHADA Home Lottery: म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे.

MHADA Home Lottery: योग्य दरात प्रशस्त घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाला(MHADA Lottery) ओळखले जाते. ज्या ज्या वेळी म्हाडाच्या घरांची लॉटरी निघते त्यावेळी कित्येक लोक यासाठी अर्ज(Apply) करतात. पण बऱ्याच वेळा ‘म्हाडा’च्या योजनेतून घर घेताना कागदपत्रांची यादी(Document List) पाहूनच नको त्या फंदात पडायला, असं अनेक सर्वसामान्य लोकांचं मत असतं परंतु आता लोकांच्या याच समस्येला हेरून म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे. यासाठी ॲपच्या(App) मदतीने ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. नक्की कोणकोणते कागदपत्रं सादर करावे लागणार आहेत चला तर जाणून घेऊयात.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA Lottery) अंतर्गत गरीब, मध्यम आणि उच्च गटांमधील नागरिकांसाठी विविध गृहनिर्माण योजना(Housing Scheme) राबविण्यात येत असतात. या योजनेत प्रवेश करण्यासाठी अर्जदाराला अर्ज भरताना 21 कागदपत्रे जोडणे अनिवार्य होते. शिवाय, मानवी पद्धतीने पात्रता पडताळणी केली जात होती. त्यामुळे सोडतीपासून सदनिकेचा ताबा घेण्यापर्यंत प्रदीर्घ काळ हा अर्जदारासाठी अतिशय त्रासदायक व मनस्ताप देणारा होता.याचा परिणाम म्हाडाच्या घरांच्या खरेदीवर(MHADA House Buying) होऊ लागला व म्हाडाची घरे रिकामी राहत असल्याचे निरीक्षणातून(observation) समोर आले. त्यामुळेच तर आता म्हाडाने ही सर्व प्रक्रिया(Process) एका ॲपद्वारे आणि कमी कागदपत्रांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन प्रक्रिया कशी आहे?

नव्या पद्धतीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वीच ऑनलाईन पद्धतीने(Online System) तपासली जाईल. यासाठी केवळ 6 कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. अर्जदाराच्या अर्जाची जलद आणि अचूक पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. ॲप प्रणालीने पात्र ठरलेल्या अर्जदारांचाच सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे आता डीजी लॉकरमध्ये(DIGILocker) सुरक्षित राहतील व सोडतीनंतर निकाल एसएमएस(SMS), ई-मेलद्वारे(E-mail) आणि ॲपमध्ये(App) तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. 
या प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणार आहे. येत्या 5 जानेवारी रोजी 5328 सदनिकांसाठी सोडतीचा प्रारंभ होणार असून या योजनेपासूनच ॲपद्वारे अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

MHADA Lottery साठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र पुरावा(Identity proof) - आधारकार्ड (Aadhaar card should be linked to mobile) आधारकार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे गरजेचे आहे
  • पॅनकार्ड(Pan Card)
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र(Maharashtra Domicile Certificate) - तहसीलदार यांनी दिलेले चालू पाच वर्षांमधील अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यावर क्यूआर(QR Code) कोड देखील गरजेचा आहे
  • स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा(Income Certificate) - प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा विवाहित असल्यास- पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा पती/पत्नीचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र (नोकरी असल्यास) किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल 
  • जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र(Cast Certificate) तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र
  • स्वघोषणापत्र