Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zero Balance Account: घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात सुरु करा 'झिरो बॅलन्स अकाउंट'

Zero Balance Account

Zero Balance Account: घरबसल्या तुम्ही देखील तुमचे झिरो बॅलन्स खाते ऑनलाईन ओपन करू शकता.

Zero Balance Account: हल्ली बँक खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही किंवा बँकेच्या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याचीही गरज नाही. घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन बँक खाते(Online Bank Account) उघडणे आता शक्य झाले आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काही आवश्यक कागदपत्रं जमा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये बँक खाते उघडता येते. तुम्ही ‘झिरो बॅलन्स अकाउंट(Zero Balance Account)’ बद्दल तर नक्कीच ऐकले असेल. याच खात्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय ऑनलाईन हे खाते कसे उघडायचे? चला तर जाणून घेऊयात.

'झिरो बॅलन्स अकाउंट' म्हणजे काय?

'झिरो बॅलन्स अकाउंट(Zero Balance Account)' हे काही वेगळे नसून कोणत्याही इतर बँक खात्याप्रमाणेच आहे. फक्त या खात्यामध्ये रक्कम शिल्लक राहावी अशी अट नसते. ज्या व्यक्तींच्या खात्यात वारंवार रक्कम झिरो होत असेल किंवा ज्यांना शिल्लक रक्कम ठेवायची चिंता न करता सेविंग्स अकाउंटचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी झिरो बॅलन्स अकाउंट एक उत्तम पर्याय आहे. ऑनलाईन झिरो बॅलन्स अकाउंट(Zero Balance Account) उघडण्यासाठीच्या स्टेप्स जाणून घेऊयात.

ऑनलाईन पद्धतीने झिरो बॅलन्स अकाउंट सुरु करा अवघ्या काही मिनिटात

  • बँकेची अधिकृत वेबसाईट(Bank Website) किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅप(Mobile Banking App) ओपन करा 
  • मोबाईल नंबर सबमिट करून झाल्यावर प्रक्रिया सुरू करा
  • त्यानंतर विचारण्यात आलेले सर्व डिटेल्स जसे की आयडी प्रूफ, फोन नंबर इ. माहिती भरा आणि सबमिट करा
  • आधार कार्ड(Aadhar Card), पॅन कार्ड(Pan Card), ड्रायविंग लायसन्स(Driving License) अशी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 
  • याव्यतिरिक्त 2 पासपोर्ट साईज फोटोंची(Passport size photo) पण आवश्यकता असणार आहे 
  • त्यानंतर व्हिडीओ केवायसी व्हेरीफीकेशन(KYC Verification) करा. केवायसी व्हेरीफीकेशन सर्व ऑनलाईन बँकिंगसाठी अनिवार्य करण्यात आले आहे
  • सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर खातेधारकाला अकाउंट नंबर(Account number) आणि कस्टमर आयडी(Customer ID) नंबर पाठवण्यात येईल 
  • या नंबरचा वापर करून खातेधारकाला झिरो बॅलन्स सेविंग्स अकाउंटमध्ये सहज लॉग इन(Log in) करता येणार आहे