Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) कसा दाखल करायचा?

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) कसा दाखल करायचा?

आपल्या उत्पन्नातील एक मर्यादित भाग केंद्र सरकारकडे भरावा लागतो, यालाच आयकर भरणे (income tax filing) म्हणतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक पद्धतीचे फॉर्म आहेत. जे विविध आयकर आणि करदात्यांवर आधारित आयटीआर (ITR filing) भरण्यासाठी वापरले जातात.

आपण जिथे राहतो तिथे सर्व सोयीसुविधा सरकारने पुरवल्या पाहिजेत असे प्रत्येकाला वाटत असते. काही प्रमाणात सरकार महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे सर्व करण्यासाठी सरकारजवळ पुरेसा निधी असायला हवा. त्यातूनच सरकार आपल्याला या सुविधा देऊ शकतं. देश किंवा राज्य चालवण्यासाठी सरकार नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारे कर गोळा करत असतं. दरवर्षी सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आयकर स्लॅब ठरवत असतात. कधी हा स्लॅब वाढवला जातो तर कधी कमी केला जातो. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती सरकारकडे कर भरत (File ITR) असतो.

आपल्या उत्पन्नातील एक मर्यादित भाग केंद्र सरकारकडे भरावा लागतो, यालाच आयकर भरणे (ITR Filing) म्हणतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक पद्धतीचे फॉर्म आहेत. जे विविध आयकर आणि करदात्यांवर आधारित आयटीआर भरण्यासाठी वापरले जातात. यात ITR-1 ते ITR-7  असे सात फॉर्म आहेत. यापैकी ITR-1 फार्मविषयी माहिती घेऊ. ITR-1 या फॉर्मला ‘सहज’ असेही म्हणतात. ITR-1 हा फॉर्म अशा व्यक्तीला लागू होतो, ज्याचे उत्पन्न पगार, पेन्शन, घरगुती मालमत्ता, व्याज यातून येते आणि ज्यांचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे.


ITR-1 असा भरायचा (How to File ITR 1)

इन्कम टॅक्स विभागाने उत्पन्नाचा परतावा करण्यासाठी ई-फायलिंगसाठी स्वतंत्र पोर्टल स्थापन केले. उत्पन्नाचा रिटर्न ई-फायलिंगसाठी (ITR e filing) करदाते www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉग-इन करू शकता. तुमचा युझर आयडी आणि पासवर्डद्वारे ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग-इन करा. जर युजर ID नसेल तर प्रथामिक माहिती भरून तुम्ही युझर-आयडी तयार करू शकता. ऑनलाईन रिटर्नचा पर्याय निवडा. स्टार्ट न्यू फिलिंग करून वैयक्तिक यूझरवर क्लिक करून ITR-1 फॉर्म निवडा. त्यात माहिती संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर बँकेची आणि वैयक्तिक माहिती भरा.

ITR - 1 भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात (Requirements for Filing ITR 1)

  • पॅन कार्ड
  • बँक स्टेटमेंट
  • बँका किंवा पोस्टातील बचतीची प्रमाणपत्रे
  • कर-बचत गुंतवणुकीचे पुरावे
  • फॉर्म 16 (नोकरदार व्यक्तींसाठी)
  • वेतन स्लिप
  • टीडीएस प्रमाणपत्र
  • फॉर्म 26 एएस

ITR ऑफलाईन कसा भरायचा (How to File ITR Offline)

तुम्हाल लागू असलेला ITR फॉर्म Java किंवा Excel फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून तो भरा. त्यानंतर XML तयार करून आणि ई-फायलिंग पोर्टलवर लॉग-इन करून अपलोड करा. अशा पद्धतीने सर्व प्रकारचे आयटीआर फॉर्म भरता येतात.