Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indexation of Property Sale: घराच्या विक्रीवर लागू असणारे 'इंडेक्सेशन' नक्की काय आहे? याचा काय परिणाम होतो?

Indexation of Property Sale

Image Source : https://www.freepik.com/

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात करप्रणाली संदर्भात काही मोठे बदल केले आहेत. भांडवली कर व मालमत्ता विक्री संदर्भातील इंडेक्सेशनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात करप्रणाली संदर्भात काही मोठे बदल केले आहेत. सर्वात प्रमुख बदल हा भांडवली करासंदर्भातील आहे. भांडवली कर व मालमत्ता विक्री संदर्भातील इंडेक्सेशनमध्ये मोठा बदल करण्यात आल्याने सरकारला टीकेचा सामना करावा लागला. आधी मालमत्ता विक्रीनंतर मिळणारा इंडेक्सेशनचा लाभ वगळण्यात आला होता. मात्र, टीका झाल्यानंतर यात काही बदल करण्यात आला.

इंडेक्सेशन म्हणजे नक्की काय? याचा कसा फायदा होतो व सरकारकडून भांडवली नफ्यावरील करात काय बदल करण्यात आले आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भांडवली नफा करात काय बदल करण्यात आले आहेत?

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भांडवली नफा करात बदल करण्यात आल्याची घोषणा केली. कोणतीही अचल मालमत्ता जसे की शेअर्स, घर, म्युच्युअल फंड, बाँड्स, सोने यांच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जातो.

तुम्ही मालमत्तेची खरेदी केल्यानंतर किती कालावधीत विक्री करता यावर भांडवली नफा कर (Capital Gains Tax) आकारला जातो. घरासाठी भांडवली नफा कराचा कालावधी हा 2 वर्ष आहे. समजा, तुम्ही 2 वर्षाच्या आधी घर विकल्यास अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल. तर दोन वर्षानंतर विकल्यास दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल. शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँड्स, सोने यांच्यासाठी हा कालावधी 1 वर्ष आहे.

दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर आता 20 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आला आहे. मात्र, घराच्या विक्रीवर मिळणारा इंडेक्सेशनचा फायदा आता मिळणार नाही. इंडेक्सेशनचा फायदा न मिळाल्याने मालमत्ता विक्री करणाऱ्याला जास्त कर भरावा लागू शकतो. तर ठराविक मालमत्तेवर अल्पकालीन भांडवली नफा कर 15 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आला आहे.

इंडेक्सेशन म्हणजे नक्की काय?

इंडेक्सेशन हे एकप्रकारे महागाई निर्देशांक आहे. घराच्या विक्रीनंतर यापूर्वी इंडेक्सेशनचा फायदा मिळत असे. घराची खरेदी व विक्रीच्या दरम्यान झालेली चलनवाढ समायोजन केले जाते. म्हणजेच घराच्या विक्रीवर झालेला नफा हा इंडेक्सेशननुसार अ‍ॅडजस्ट केला जात असे. इंडेक्सेशनमुळे नफ्यावरील कर कमी भरावा लागत असे. मात्र, आता इंडेक्सेशनची अट हटविण्यात आल्याने जास्त कर भरावा लागू शकतो. 

आता इंडेक्सेशनचा फायदा केवळ भारतीय व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाला मिळणार आहे. तसेच, यासाठी 23 जुलै 2024 पूर्वी खरेदी केलेली मालमत्ता ग्राह्य धरली जाईल.

इंडेक्सेशन हटवल्यामुळे फायदा होईल की तोटा?

याआधी घराच्या विक्रीवर 20 टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जात होता.  आता हा कर 12.5 टक्के करण्यात आला आहे. परंतु, याआधी मिळणारा इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाही.

समजा, तुम्ही 2001-02 मध्ये 15 लाख रुपयांना कर घेतले आहे. 2024 मध्ये त्याच घराची 50 लाख रुपये किंमतीत विक्री करत आहात. घराच्या खरेदी व विक्रीमध्ये 35 लाख रुपयांचा फरक आहे. जुन्या पद्धतीनुसार इंडेक्सेशन लागू असल्यास वाढती महागाई लक्षात घेता अ‍ॅडजस्टमेंट केल्यानंतर घराची विक्री किंमत 40 लाख रुपये झाली. आता मूळ विक्री किंमत  व इंडेक्सेशननुसार अ‍ॅडजस्ट केलेली किंमत यात 10 लाख रुपयांचा फरक आहे. याच 10 लाख रुपयांच्या नफ्यावर तुम्हाला 20 टक्के दराने 2 लाख रुपये कर भरावा लागेल. याशिवाय, 4 टक्के अतिरिक्त  आरोग्य आणि शैक्षणिक कर देखील यावर द्यावा लागेल.

मात्र, आता इंडेक्सेशन लागू नाही. अशावेळी तुम्हाला संपूर्ण 35 लाखांच्या नफ्यावर 12.5 टक्के दराने 4 लाख 375 रुपये कर भरावा लागेल.