Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Refunds: आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसात मिळेल टॅक्स रिफंड? जाणून घ्या

Income Tax Refunds

Image Source : https://www.freepik.com/

आयटीआर भरल्यानंतर अनेकजण रिफंडची वाट पाहत असतात. तुम्ही देखील आयटीआर दाखल केले असल्यास कधीपर्यंत टॅक्स रिफंड मिळू शकतो, त्याबाबत जाणून घ्या.

5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना आर्थिक वर्ष 2023-24 व मुल्यांकन वर्ष 2024-25 साठीचे आयटीआर दाखल केले आहे. आयटीआर भरल्यानंतर अनेकजण रिफंडची वाट पाहत असतात. प्रामुख्याने अतिरिक्त टॅक्स भरणारे रिफंडची वाट पाहतात. तुम्ही देखील आयटीआर दाखल केले असल्यास कधीपर्यंत टॅक्स रिफंड मिळू शकतो, त्याबाबत जाणून घ्या.

कोणाला मिळतो टॅक्स रिफंड?

आयटीआर भरल्यानंतर आयकर विभागाद्वारे त्याचे मुल्यांकन केले जाते. तुम्ही जर जास्त टॅक्स भरलेला असल्यास विभागाद्वारे रिफंड दिले जाते. टीडीएस कापला गेला असल्यास अथवा आगाऊ टॅक्स भरला असल्यासही आयकर विभागाकडून रिफंड बँक खात्यात जमा केला जातो.

आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळेल टॅक्स रिफंड?

आयटीआर व्हेरिफिकेशनंतर प्रोसेसिंगसाठी 15 ते 45 दिवस लागू शकतात. तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने आयटीआर भरला असल्यास यासाठी अधिक दिवस लागतील. 

प्रोसेसिंगनंतर 4 ते 5 आठवड्यात करदात्याच्या बँक खात्यात रिफंड जमा होतो. आधी या प्रक्रियेसाठी काही महिने लागत असे. मात्र, आता ऑनलाइन सुविधेमुळे रिफंडची प्रक्रिया जलद पार पडते.

 टॅक्स रिफंड न मिळाल्यास काय कराल?

काहीवेळेस टॅक्स रिफंड मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. अशावेळी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर रिफंडचे स्टेट्स तपासू शकता. तसेच, काही त्रुटी असल्यास अथवा इतर माहिती हवी असल्यास ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल. यानंतरही रिफंड न मिळाल्यास तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवरील हेल्पलाइन क्रमांकावरून तक्रार नोंदवू शकता.

लक्षात घ्या की, आयकर विभागाकडून केवळ अशाच बँक खात्यात पैसे जमा केले जातात जे आयटीआर भरताना व्हेरिफाइड केले असतील. तसेच, या बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. बँक खात्याची माहिती देताना चूक झाल्यास रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो.

टॅक्स रिफंडचे स्टेट्स ऑनलाइन कसे तपासू शकता?

  • आयटीआर भरल्यानंतर टॅक्स रिफंडचे स्टेट्स तपासण्यासाठी तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टल https://eportal.incometax.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
  • या साइटवर गेल्यानंतर Income Tax Return (ITR) Status या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला आयटीआर भरल्यानंतर मिळालेला पोचपावती क्रमांक व मोबाइल नंबर द्यावा लागेल.
  • आता मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला आयटीआर स्टेट्स दिसेल. आयकर विभागाकडून ई-मेल व मेसेजच्या माध्यमातूनही वेळोवेळी रिफंडबाबत माहिती दिले जाते.