Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Refund: टॅक्स रिफंड अद्याप मिळाला नाही? विलंब होण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

Income Tax Refund

Image Source : https://www.freepik.com/

31 जुलैपूर्वी जवळपास 7 कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आयटीआर भरले आहे. यापैकी अनेकजण आता रिफंडची वाट पाहत आहेत. अनेकदा आयटीआरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून रिफंड लवकर मिळत नाही.

31 जुलैपूर्वी जवळपास 7 कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आयटीआर भरले आहे. यापैकी अनेकजण आता रिफंडची वाट पाहत आहेत. जास्तीचा अथवा आगाऊ कर भरणारे, पगाराच्या रक्कमेवर टीडीएस कपात झालेल्यांना रिफंडचा फायदा मिळतो. मात्र, अनेकदा आयटीआरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून रिफंड लवकर मिळत नाही. तुम्ही देखील आयटीआर भरला असल्यास टॅक्स रिफंड मिळण्यास का विलंब होऊ शकतो व याबाबतचे स्टेट कसे तपासू शकता, याबाबत जाणून घ्यायला हवे.

रिफंडला विलंब होण्याची काय आहेत कारणे?

टॅक्स रिफंडला विलंब होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे पॅन व आधार कार्ड लिंक नसणे. याशिवाय, आयटीआर फाइल करताना दिलेल्या माहितीत त्रुटी असणे, हे देखील प्रमुख कारण आहे. आयकर विभागाकडून अनेकांना याबाबत ईमेल व एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली आहे.

याशिवाय, बँक खाते प्री-व्हॅलिडेट नसणे, हे देखील रिफंड न मिळण्यामागचे कारण असू शकते. पॅन व बँक खात्यावर नमूद असलेल्या नावात फरक, चुकीचा आयएफएससी कोड व आयटीआर फाइल करताना माहिती दिलेले बँक खाते बंद असणे ही देखील काही कारणे असू शकतात. 

काहीवेळा आयकर विभागाला अतिरिक्त माहिती देखील हवी असते. याबाबत आयकरदात्याला ईमेल व मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाते. ही त्रुटी दूर केल्यानंतर बँक खात्यात रिफंड जमा होतो.

वेबसाइटवरून जाणून घ्या रिफंड स्टेट्स

  • रिफंडची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आयकर विभागाची वेबसाइट https://eportal.incometax.gov.in वर जावे लागेल.
  • वेबसाइटवर गेल्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करा. तुमचे पॅन व आधार लिंक नसल्यास त्याबाबतची माहिती दिसेल. तुम्हाला त्वरित पॅन-आधार लिंक करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर ई-फाइल पर्यायावर जाऊन Income Tax Returns  व त्यानंतर View Filed Returns पर्यायावर क्लिक करा.
    आता तुम्हाला ज्या आर्थिक वर्षाच्या रिफंडबाबत जाणून घ्यायचे आहे, ते वर्ष निवडा.
  • त्यानंतर View Details पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिफंड स्टेट्सबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
  • येथे तुम्हाला रिफंड जमा झाले आहे की नाही, अथवा रद्द झाले आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय, मेसेज व ईमेलच्या माध्यमातूनही याबाबतची माहिती दिली जाते.

आयकर विभागाशी साधा संपर्क

तुम्ही रिफंडला विलंब झाल्यास आयकर विभागाचा ईमेल आयडी orm@cpc.incometax.gov.in , ask@incometax.gov.in यावरही तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, 18001030025, 18004190025, 8046122000, 8061464700 या क्रमांकावरही संपर्क साधून माहिती जाणून घेता येईल.

एनएसडीएलची अधिकृत वेबसाइट https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वरून देखील सहज रिफंड स्टेट्सबाबत जाणून घेऊ शकता.