Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून, बियाणे खरेदीपासून तर मालविक्रीपर्यंत असणाऱ्या सरकारच्या योजना

Farmer

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते.

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. देशातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. भारतातील कृषी उत्पादनामुळे देशाची तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणीही पूर्ण होत आहे. परदेशात शेतीमालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना चांगला पैसाही मिळतो, पण जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसा शेतीचा खर्च आणि तोटाही वाढत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी आणि शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना आहेत, त्या पुढीलप्रमाणे. 

शेतकऱ्यांना कर्जापासून ते विमा, अनुदान, कृषी कामांसाठी अनुदानापर्यंतच्या सुविधा दिल्या जात असून, याशिवाय पेरणीसाठी बियाणे खरेदी, सिंचनाची व्यवस्था, फवारणीसाठी कीटकनाशकांवर अनुदान, पीक संरक्षणासाठी पीक विमा, साठवणूक इत्यादि सुविधा देण्यात येत आहेत. 

शेती कर्जासाठी योजना

'किसान क्रेडिट कार्ड योजना' ही शेतीविषयक कामांसाठी चालवली जात आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करण्यासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज दिले जाते. शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेत किंवा वित्तीय संस्थेत जाऊन त्यांचे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. 

माती परीक्षण योजना

चांगल्या पीक उत्पादनासाठी मातीचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणून शासनाने मृदा आरोग्य कार्ड योजना तयार केली आहे. अर्ज केल्यावर, तज्ञ स्वत: शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करतात आणि माती परीक्षण केल्यानंतर त्यात कोणते घटक कमी आहेत, पिकं घेण्या योग्य जमीन तयार करण्यासाठी काय करावे लागेल? या सर्व गोष्टी सांगतात. त्याच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन तर मिळू शकतेच, पण मोठे नुकसानही टाळता येते.

बियाण्यांसाठी योजना

सरकारने शेतकऱ्यांसाठी बीज ग्राम योजना सुरू केली आहे. याशिवाय चांगल्या उत्पादनासाठी विविध पिकांच्या सुधारित बियाण्यांच्या खरेदीवर अनुदान किंवा बियाण्यांचे मिनी किट उपलब्ध करून दिले जातात. राज्येही त्यांच्या स्तरावर बियाणे अनुदान योजना राबवतात.

शेतात सौर पंपाची योजना

प्रत्येक शेताला पाणी मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना चालवली जात आहे, ज्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सौर पंप उभारण्यासाठी अनुदान देते. डिझेल किंवा विजेवर चालणारे सिंचन पंप खूप महाग आहेत. दुसरीकडे, सौर पंप हे सूर्याच्या ऊर्जेवर आधारित आहेत, ज्यासाठी काहीही खर्च होत नाही, परंतु सौर पंप खरेदी करणे सोपे करण्यासाठी, सरकार 60% पर्यंत सबसिडी देखील देते.

सिंचन योजना

आधुनिक तंत्राने सिंचन केल्याने 80% पाण्याची बचत होऊन पीक उत्पादनात वाढ होऊ शकते. पाण्याची बचत करण्याचे हे तंत्र म्हणजे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन, जे सरकार शेतकऱ्यांना 'प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने' अंतर्गत कमी पैशात उपलब्ध करून देते.

उत्पादनाच्या विक्रीची योजना

आता शेतकरी घरबसल्या आपला माल ऑनलाइन विकू शकतात. यासाठी ई-नाम योजना सुरू करण्यात आली आहे. या ई-ट्रेडिंग पोर्टलवर शेतकरी त्यांच्या मालाची वाजवी किंमत ऑनलाइन ठरवतात. यानंतर व्यापारीही ऑनलाइन बोली लावून शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करतात. याच दरम्यान ते शेतमाल गोळा करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातही पोहोचतात.

वाहतूक योजना 

शेतकरी आता आपला माल देशात आणि परदेशात कुठेही विकू शकतात. फळे, भाजीपाला, धान्य, दूध, अंडी आणि मांस यांच्या योग्य वाहतुकीसाठी किसान रेल आणि किसान उडानच्या सेवा पुरवल्या जात आहेत. शेतकरी आता त्यांची उत्पादने ट्रकच्या ऐवजी ट्रेन आणि फ्लाइटने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतात.

फळ-भाजीपाला लागवडीची योजना

धान्य पिकातून योग्य उत्पादन न मिळाल्यास राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेचा लाभ घेऊन फळबाग लावू शकता. यासोबतच भाजीपालाही घेता येतो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत आधुनिक शेती व फळबाग लागवडीसाठी तांत्रिक प्रशिक्षण व आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून फळबाग पिकांच्या उत्पादनात वाढ करता येईल.

यासोबतच शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, कर्जमाफी योजना, अनुदान सुद्धा दिले जाते. या सर्व योजनांचा वापर करून शेतकरी कर्जबाजारी न होता शेती करू शकतो.