Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Yojna: अनेक शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले जाण्याची भीती, काय आहे बातमी, वाचा सविस्तर

pm kisan yojna

देशात शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेच्या १५ वा टप्प्याची शेतकरी वाट पाहात आहेत. मात्र या योजनेतून आता काही शेतकऱ्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे.

देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात भारत सरकार पैसे पाठवतं. हे पैसे किती आहेत ते आधीच ठरलेलं असतं. शेतकऱ्यांच्या कमाईत केंद्र शासन याद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतं. आजवर याच्या 14 टप्प्यांमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे.आता शेतकरी याच्या 15 व्या टप्प्याची आतुरतेनं वाट पाहात आहेत. मात्र या 15 व्या  टप्प्यातून अनेक शेतकरी वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये देतं आणि हे सहा हजार रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जातात. म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जातात.

15 व्या शेतकरी सन्मान योजनेच्या यादीतून यंदा मात्र काही शेतकरी वगळले जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणं मुश्कील होणार आहे त्यावर एक नजर टाकूया

कोणते शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहू शकतात?

  • जे शेतकरी या सन्मान निधीचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत होते, त्यांना या यादीतून वगळलं जाऊ शकतं. अशा शेतकऱ्यांबाबत पडताळणी चालू आहे. कायद्यानुसार हे शेतकरी अपात्र ठरल्यास त्यांच्याकडून वसूलीही केली जाऊ शकते.
  • ज्या शेतकऱ्यांनी चुकीचं बँक खातं दिलं असेल आणि त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड यावरील नावात फरक असल्यास असे शेतकरी या योजनेतून बाद होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना, शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हफ्ता मिळणं कठीण होऊ शकतं.
  • अनेक शेतकरी या योजनेशी नव्याने जोडले गेले आहेत. मग अशा शेतकऱ्यांनी आपल्याविषयीची माहिती उदाहरणार्थ आधार कार्ड, लिंग, पत्ता आदी गोष्टी नोदवण्यात चूक केली असेल तर असेही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यांनाही या योजनेच्या 15 व्या हफ्त्याचा लाभ मिळू शकणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी इकेवायसी केली नसेल, त्यांचीही नावं लाभार्थ्यांच्या लिस्टमधून बाहेर काढली जातील. सर्व शेतकऱ्यांना इकेवायसी करणं बंधनकारक आहे. यासाठी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा pmkisan.gov.in या संकेतस्थळावर आपली इकेवायसी करता येऊ शकेल.असं न केल्यास हे शेतकरीही 15 व्या शेतकरी सन्मान योजनेच्या हफ्त्यापासून वंचित राहू शकतील.
  • ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी आपलं नाव नोदवलं असेल, तर त्याचं स्टेटस माहिती करून घेण्यासाठी ते शेतकरी 155261 या क्रमांकावर फोन करून माहिती घेऊ शकतात.