प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा 15 वा हफ्ता कधी मिळेल अशी तुम्ही देखील विचारणा करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. केंद्र सरकार लवकरच देशभरातील पात्र शेतकऱ्यांना किसान सम्मान निधीचा 15 वा हफ्ता जारी करणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.
Table of contents [Show]
काय आहे योजना?
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 2 हजार रुपये प्रमाणे एकूण 6 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामे करण्यासाठी, शेतीसंबंधी अवजारे, बी-बियाणे खरेदीसाठी या पैशाची मदत होत असते.
2019 पासून आतापर्यत शेतकऱ्यांना योजनेचे 14 हफ्ते वितरीत केले गेले आहेत. आता शेतकरी वाट बघत आहेत ती 15 व्या हफ्त्याची.
कधी मिळणार 15 वा हफ्ता?
जर तुम्ही या योजनेसाठी नाव नोंदणी केली असेल आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हांला थेट तुमच्या बँक खात्यात ही रक्कम मिळणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार पुढील महिन्यात दिवाळीच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. 30 नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान योजनेचे पैसे हस्तांतरित केले जातील असे जाणकारांचे म्हणणे आहे. 27 जुलै 2023 रोजी या योजनेचा 14 वा हप्ता स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जारी केला होता.
दिवाळी होईल गोड
यंदा पावसाने दडी मारली आहे. देशातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नाही. अनेक भागांमध्ये दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीपाचे पिक देखील समाधानकारक निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेमार्फत आर्थिक मदत झाल्यास शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होऊ शकते.
मोबाईल नंबरवरून चेक करा स्टेट्स
जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 155261 या किसान सम्मान निधीच्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता आणि माहिती मिळवू शकता.