Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अल्प भू-धारक शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

Benefit from Kisan Credit Card Scheme

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च भागवण्याबरोबरच, यापूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही करता येऊ शकतो.

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरूवात 1998 मध्ये शेतकऱ्यांना शेतीतील लहान-मोठे खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development-NABARD)तर्फे तयार करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card-KCC) ही योजना शेतकऱ्यांना शेती, मासेमारी आणि शेतीशी संबंधित पूरक व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना एका ठराविक कालमर्यादेत फेडावे लागते. या अल्प मुदतीच्या कर्जातून शेतकरी शेतीशी संबंधित अवजारे, बियाणे आणि इतर छोट्यामोठ्या वस्तू विकत घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्डमधून शेतकऱ्यांना अत्यंत माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. किसान क्रेडिट कार्डद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा कमीतकमी 2 टक्के आणि सरासरी 4 टक्के असतो. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी यापूर्वी घेतलेल्या जास्तीच्या व्याजदराचे कर्ज फेडू शकतात.

किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेतीशी संबंधित आर्थिक खर्च भागवण्यासाठी रक्कम उपलब्ध करून दिली जाते.
  • या योजनेंतर्गत शेतकरी 3 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर ते शेतीच्या मालाचे मार्केटिंग करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.
  • किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या लाभार्थ्याला कायमचे अंपगत्व किंवा त्याचा मृत्यू झाल्यास 50 हजारापर्यंतचा इन्शुरन्स  मिळू शकतो. तसेच इतर जोखमींसाठी 25 हजारांचा इन्शुरन्स लागू होतो.
  • या योजनेतील लाभार्थ्यांच्या नावाने आकर्षक व्याजदर देणाऱ्या बॅंकेत बचत खाते ओपन करता येते. तसेच त्याला किसान क्रेडिट कार्डबरोबरच  बॅंकेकडून स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड दिले जाते.
  • किसान क्रेडिट कार्डमधून मिळणारे कर्ज लाभार्थ्याच्या सोयीनुसार फेडता येणार आहे.
  • शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी/दलाल यांच्याकडून सवलत मिळवण्यासाठी या योजनेला लाभ मिळू शकतो.
  • या योजनेंतर्गत मिळणारे कर्ज हे 3 वर्षांपर्यंत फेडू शकतो. तसेच 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या तारणाची आवश्यकता नाही.

किसान क्रेडिट कार्डची पात्रता काय आहे?

  • शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • शेतकऱ्याचे वय 18 पेक्षा कमी आणि 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • 60 वर्षांवरील शेतकऱ्याला अर्ज करताना 60 वर्षाखालील सहकर्जदार असणे आवश्यक आहे.
  • स्वत:च्या मालकीची शेती असणारे आणि भाडे करारावर शेती करणारे शेतकरी या योजनेला लाभ घेऊ शकतात.
  • शेतीशी निगडित जोडधंदा करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. उदा. मासेमारी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय.

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याने संपूर्ण माहिती भरलेला अर्ज
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • निवासाचा पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जमिनीची कागदपत्रे
  • अर्जदाराचे फोटो

अर्ज करण्याची पद्धत

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी  ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीप्रकारे अर्ज करू शकतो.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

तुम्हाला ज्या बॅंकेमध्ये खाते सुरू करायचे आहे. त्या बॅंकेच्या वेबसाईटवर जाऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेवर जाऊन अर्ज करू शकता. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्ही ऑनलाईन खाते ओपन करू शकता. आपण उदाहरण म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून अर्ज कसा भरला जातो, ते पाहुया.  एसबीआयच्या वेबसाईटवर किसान क्रेडिट योजनेची माहिती देण्यात आली आहे. तिथेच खाली आवेदन पत्र (Application Form) देण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यावर किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज ओपन होतो. हा अर्ज भरून पुन्हा बॅंकेत जमा करावा लागतो.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीत लाभार्थ्याला जवळच्या बॅंकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज भरणे बंधनकारक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज बॅंकेत जमा करावा लागतो. बॅंकेचे अधिकारी त्यावर प्रक्रिया करून आणि कागदपत्रांची तपासणी करून शेतकऱ्याच्या खात्यात कर्जाचे पैसे जमा करतात.