तुम्ही पदवी अभ्यासक्रम (Graduate) पूर्ण केला असेल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर नवीन वर्षासाठीची भरती प्रक्रिया सरकारने हळू हळू सुरू केली आहे. आणि काही नोकऱ्यांची नोटिफिकेशनही जारी केली आहेत. यात सेल (SAIL) या कंपनीमध्येही भरती सुरू असल्याचं दिसतंय. साधारणपणे लिपिक, कारकून, शिक्षक यांच्यासाठी या नोकऱ्या उपलब्ध आहेत. जानेवारीमध्येच प्रक्रिया करून 13,000 पेक्षा जास्त पदं भरण्याचा सरकारचा विचार आहे.
सेल (SAIL) रोजगार संधी
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या सरकारी कंपनीने 2 डिसेंबरला विविध पदांसाठी नोकरीचे अर्ज मागवले आहेत. आणि त्याची सविस्तर माहिती तुम्ही www.sailcareers.com या कंपनीच्या वेबसाईटवर घेऊ शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर इतकी आहे. काही नोकऱ्या कन्सल्टिंग तत्त्वावर उपलब्ध आहेत. याशिवाय प्रबंधक, सर्व्हेयर आणि इतरही अनेक पदं भरायची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर आहे.
मध्यप्रदेश लिपिक पदासाठी नोकर भरती (3555 पदं)
मध्यप्रदेशच्या रोजगार निवड समिती मंडळ (MPESB) आणि मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा बोर्डाने (MPPEB) गट दोनसाठी 3555 रिक्त पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ही पदं लिपिक, अनुवादक, सहाय्यक शिक्षक, वाचनालय सहाय्यक, लेखा परीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, स्टेनो, विपणन अधिकारी, प्रोबेशन अधिकारी, कोच तसंच निर्देशक या पदांसाठी आहे. मध्य प्रदेशात त्या त्या गावात राहण्याची तयारी असलेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. कुठल्याही विषयात स्नातक परीक्षा उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. या जागांसाठीचे अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 जानेवारी 2023 अशी आहे. तक आवेदन किया जा सकता है.
ओडिशा शिक्षक भरती (7,540 पदं)
ओडिशा कर्मचारी निवड आयोग तसंच तिथल्या शिक्षण मंडळाने हिंदी, संस्कृत, तेलुगू, उर्दू तसंच शारीरिक शिक्षण या विषयांची शिक्षकांची भरती करण्यासाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. एकूण 7,540 पदं भरायची आहेत. त्या विषयातील स्नातक परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची मुदत सुरू झाली असून अंतिम तारीख 6 जानेवारी 2023 अशी आहे.