Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold & Silver Update

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Gold- Silver Price Today: दिवाळीनंतर लग्नसराईचे मुहूर्त सुरु झाले आहेत. त्याचमुळे सगळीकडे हल्ली आपल्याला लग्नसराई पाहायला मिळत आहे. यासोबतच आता विविध सणांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी(Gold Buying) करण्याला पसंती देत आहेत. आर्थिक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीमध्ये लोक गुंतवणूक करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढलेले भाव पाहता ग्राहकांनी सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी कमी केल्याचे पाहायला मिळत आहेत. नेमका आज सोन्याचा भाव काय? चला जाणून घेऊयात.

आजचा सोन्याचा दर काय?

गुड रिटर्न्स वेबसाईटच्या(Good Returns website) माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे. मात्र मागच्या ट्रेडमध्ये चांदीची किंमत 71,500 रुपये प्रतिकिलो होती, जी आता 400 रुपयांनी वाढली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतात बदलत असतात.

तुमच्या शहरातील दर काय?

  • मुंबई - 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे 
  • पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,400 असून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये आहे
  • नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,400 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये इतका आहे
  • नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 51,430 आहे, तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 56,100 रुपये चालू आहे

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ हे अ‍ॅप बनविण्यात आले आहे. याच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपच्या माध्यमातून लगेच त्याबद्दल तक्रार नोंदवू शकतात.

हे देखील माहिती असावे

  • 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिण्यात येते 
  • 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916  लिहिण्यात येते 
  • 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875  लिहिण्यात येते 
  • 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750  लिहिण्यात येते 
  • 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिण्यात येते