भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनी यावर्षातील आपला बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) घेऊन आली आहे. फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईट आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सेलची ऑफर पोस्ट करण्यास सुरूवात केली. फ्लिपकार्टने हा सेल आगामी दसरा-दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर आणला असून, यातून खरेदीदारांना वेगवेगळ्या वस्तुंवर आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे.
फ्लिपकार्टच्या Big Billion Days Sale या सेलमध्ये फॅशन, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईलच्या ॲक्सेसिरीजवर मोठी सवलत मिळणार आहे. तसेच बॅंकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरही सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्टने Flipkart Big Billion Days Sale ची जाहिरात सुरू केली आहे. पण कंपनीने अजून या सेलची तारीख जाहीर केलेली नाही. येत्या काही दिवसांत कंपनी सेलची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान ॲमेझॉननेही Amazon Great Indian Festival Sale जाहीर केला आहे. ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. Flipkart 90 पेक्षा जास्त ब्रँड्समधून 130 हून अधिक प्रोडक्टस “बिग बिलियन डेज स्पेशल” सेलमधून आणणार आहे.
या बॅंकांच्या कार्डवर मिळेल सवलत!
फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना अधिकाधिक सूट देण्यासाठी आयसीआयसीआय आणि अक्सिस बॅंकेसोबत भागीदारी केली. सेलच्या दरम्यान या बॅंकांच्या कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर ग्राहकांना 10 इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे.
इलेक्ट्रॉनिक व ॲक्सेसिरीजवर 80 टक्के सूट!
फ्लिपकार्टने या सेलसाठी एक विशेष वेबपेज तयार केलं आहे. यामध्ये कंपनीने म्हटलंय की, या सेलमधून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि अक्सेसिरीजवर 80 टक्के सूट दिली जाणार आहे. यामध्ये हेडफोन, स्मार्टफोन, वायरलेस इअरफोन आणि आणखी बऱ्याच वस्तुंवर सूट मिळणार आहे. तर गृहोपयोगी वस्तुंमध्ये एसीवर 50 टक्के सूट दिली जाणार आहे.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर 40 टक्के सूट!
Apple, Samsung, Realme, Vivo, Poco आणि यासारख्या इतर ब्रॅण्ड्सवर मोठी सूट दिली जाणार आहे. यामध्ये नुकतेच लॉन्च झालेले स्मार्टफोन्ससुद्धा मिळणार आहेत. तर Flipkart Big Billion Days 2022 मध्ये गेमिंग लॅपटॉपवरही 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय प्रिंटर, मॉनिटर यावर 80 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंबरोबरच घरात नेहमी उपयोगी पडणाऱ्या वस्तू, लाईफस्टाईल प्रोडक्ट्स, फॅशनेबल कपडे, फर्निचर यावरही सवलत मिळणार आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन मोठ्या ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या सेलमुळे ग्राहकांची मात्र नक्कीच चांदी असणार आहे.