Low CIBIL Score : जेव्हा आपल्याला आर्थिक टंचाई येते तेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय निवडतो. कर्जाची रक्कम मोठी असेल तर बँका किंवा NBFC ची मदत घेतो. ज्या लोकांचे क्रेडिट स्कोअर चांगले आहेत त्यांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. ज्यांचा क्रेडिट स्कोअर मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांना बँक कर्ज देण्यास नकार देतात.
750 किंवा त्याहून अधिक गुण अधिक चांगले मानले जातात. CIBIL स्कोअर 700 पेक्षा कमी असलेल्यांना वैयक्तिक कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. ज्या लोकांचा CIBIL स्कोर 700 पेक्षा कमी आहे आणि त्यांना बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे त्यांनी पुढील बाबींचा अवलंब करावा.
Table of contents [Show]
आपला क्रेडिट स्कोअर चुकीचा आहे का? चेक करून घेणे
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही प्रथम तुमचा क्रेडिट रिपोर्ट चेक केला पाहिजे. अनेक वेळा क्रेडिट रिपोर्ट अपडेट होत नाही किंवा त्यात काही चुकीची नोंद असू शकते. जर तुम्हाला असा काही दोष दिसला तर कर्ज घेण्यापूर्वी ते चेक करून अपडेट करून घ्या.
कर्जाची परतफेड करण्याची बँकेला खात्री पटवून देणे
जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही त्रुटी असेल ज्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकत नाही, तर तुम्ही कर्जदाराला खात्री देऊ शकता की तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आहे. क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमचा पगार, तुमची बचत किंवा तुमच्या एकूण संपत्तीच्या डिटेल्स नसतात. अशा परिस्थितीत, हे शक्य आहे की बँक तुम्हाला थोड्या जास्त व्याजदराने कर्ज देण्यास सहमती देऊ शकते.
कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करा
वरील सर्व टिप्स काम करत नसल्यास, दुसरा मार्ग म्हणजे कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करणे. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, कर्जदाराला तुमच्या मोठ्या कर्जाच्या रकमेची EMI परत करण्याच्या क्षमतेवर शंका येऊ शकते. जर कर्जाची रक्कम कमी असेल तर तुम्ही बँकेला ते परत करण्यास पटवून देऊ शकता.
संयुक्त (Joint) कर्जासाठी अर्ज करा
तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास, तुम्ही तुमचे वडील, भाऊ, बहीण किंवा जोडीदार यांच्यासोबत संयुक्त कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत कर्जासाठी संयुक्तपणे अर्ज करणार आहात त्यांचा CIBIL स्कोर चांगला असावा. अशा प्रकरणांमध्ये, कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतर बँक कर्ज मंजूर करू शकते.
NBFC किंवा Fintech कंपन्यांकडून कर्ज
हा पर्याय एकदम शेवटी वापरू शकता. कमी क्रेडिट स्कोअर असूनही अनेक नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) आणि नवीन काळातील फिनटेक कंपन्या तुमचे कर्ज मंजूर करू शकतात. मात्र, त्यांचे व्याजदर बँकांपेक्षा जास्त असू शकतात.
Source : www.paisabazaar.com