क्रेडिट स्कोअर हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकला असेल पण क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? क्रेडिट स्कोअर म्हणजे फक्त 300 ते 900 दरम्यानची संख्या नसून ती व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असते. ग्राहकाची क्रेडिट पात्रता दर्शवते. तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितके तुम्ही बँकांसाठी विश्वासार्ह ग्राहक बनता. खात्यांची संख्या, कर्जाची पातळी, परतफेडीचा इतिहास आणि इतर अनेक घटक तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम करतात.
क्रेडिट स्कोअर कसा काम करतो? (How Does a Credit Score Work?)
क्रेडिट रेटिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ते समजून घेऊया. क्रेडिट स्कोअर तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करु शकतो. कुठलेही कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर तपासला जातो. एक चांगला क्रेडिट स्कोअर किती असतो ते जाणून घेऊया.
600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेले लोक बँकेकडून सबप्राइम कर्जदार म्हणून वर्गीकृत केले जातात. कर्ज देणाऱ्या संस्था अनेकदा या श्रेणीतील कर्जदारांसाठी जास्त दराने व्याजदर आकारतात. 700 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर सहसा चांगला मानला जातो आणि परिणामी कर्जदाराला कमी व्याजदर मिळू शकतो.
- 800 ते 850 चा स्कोअर उत्कृष्ट मानला जातो
- 750 ते 799 चा स्कोअर खूप चांगला मानला जातो
क्रेडिट स्कोअर कसा मोजला जातो (How a Credit Score is Calculated)
बँका विविध पद्धतीने क्रेडिट स्कोर मोजतात, कर्जदारने मासिक मुदतीत व्याज भरले असता व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर हा 35% पेमेंट हिस्ट्रीवर आधारित असतो म्हणजेच तुम्ही वेळेवर पेमेंट जमा करत आहात की नाही हे मोजले जाते. तुमच्या खात्यावर किती कर्ज आहे हे देखील मोजले जाते यावर आधारित क्रेडीट स्कोअर 30% इतका असतो. बँकेत तुम्हाला क्रेडिट रेटिंग मिळते या रेटिंगचा तुमच्या क्रेडीत स्कोअरमध्ये 15% इतका समावेश असतो. तसेच कर्जदाराचे वय व एकूण खाते हे देखील तपासले जाते.