Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Score : तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवण्यास 'या' सात गोष्टींवर काम करा

Credit Score

Image Source : www.metro.co.uk

Keep Your Credit Score Strong : जर तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, इत्यादी लवकरात लवकर मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल? तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याची गरज आहे. 750 पेक्षा जास्त असलेला स्कोअर चांगला समजला जातो. तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवायचा असेल, तर 'या' सात गोष्टींवर काम करा.

Work On Credit Score : तुम्हाला भविष्यात बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, इत्यादी तात्काळ घ्यायचे असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत असला पाहिजे. कारण, क्रेडिट स्कोअरचा संपूर्ण इतिहास तपासून CIBIL रेटिंग मिळवले जाते आणि त्या रेटिंगनुसार बँका तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता किती आहे? हे बघते. त्यानुसारच कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कालावधी ठरवला जातो. तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवायचा असेल, तर तु्म्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा

तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासला पाहिजे. तुम्ही  तुमचा क्रेडिट अहवाल नियमित अंतराने तपासल्यास, तुम्हाला तुमची खाती, कर्जे आणि पेमेंट इत्यादींबद्दल जागरूक राहण्यास मदत होते. असे केल्यास तुम्ही तुमच्या चुका वेळीच सुधारु शकता.

क्रेडिट कार्डबाबत सावध असा

क्रेडिट कार्ड वापरतांना त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डवर विचार न करता कर्ज घेणे टाळा. त्यामार्फत होणारा खर्च संतुलित करा. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरु शकत नसाल, तर काही तरी पेमेंट करा.

सर्व बिले वेळेवर भरा

तुम्ही तुमचे प्रत्येक बिल वेळेवर भरुन, तुमच्या मार्फत आकारले जाणारे अतिरिक्त पैसे वाचवू शकता. सोबतच, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील सकारात्मक राहील.

क्रेडिट मर्यादा वाढवू नका

क्रेडिट कंपन्यांकडून तुम्हाला सर्वोच्च क्रेडिट मर्यादा दिली जाते, परंतु ती अनावश्यकपणे वाढवणे टाळा. सर्वोच्च क्रेडिट मर्यादा देऊन क्रेडिट कंपन्या तुम्हाला अधिक कर्ज घेण्यास प्रवृत्त करु शकतात आणि यामुळे तुमची थकबाकी वाढू शकते.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेऊ नका

विनाकारण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेणे टाळा. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास त्याचे वेळेवर पेमेंट करणे, त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण होते. आणि याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअर वर होतो.

रोख व्यवहार करा

अधिकाधिक रोख व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. रोख व्यवहार करीत असतांना आपण किती पैसे खर्च करतो? याची जाणीव आपल्याला होते, आणि आपल्या खर्चावर नियंत्रण राहाते.

काळजीपूर्वक कर्ज भरा

जर तुमच्याकडे कुठले कर्ज थकबाकी असेल, तर तुम्ही ते काळजीपूर्वक भरा. नियमितपणे पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचे कर्ज वेळेवर भरल्या जाईल आणि तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला राहील.