Dhanteras 2022 Shubh Muhurat : दिवाळीतील सर्वांत पहिला आणि महत्त्वाच सण म्हणजेच धनत्रयोदशी हा यावर्षी शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) आला आहे. तिथी आणि पंचांगातील माहितीनुसार भारतातील काही भागांमध्ये धनत्रयोदशी ही 23 ऑक्टोबर या दिवशी दाखवण्यात आला आहे. अर्थात मराठी कालगणना (Calendar) आणि पंचांगानुसार भारतीय सण साजरे केले जातात. त्यामुळे त्याचे मुहूर्त वेगवेगळे (Dhanteras Shopping Muhurat 2022) असू शकतात. या मुहूर्ताला खरेदी-विक्री करणारे व्यापारी आणि बहुतांश भारतीय मानतात आणि त्यानुसारच खरेदी केली जाते. त्यात धनत्रयोदशी हा चांगल्या गोष्टींचा खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
Table of contents [Show]
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदी शुभ मानली जाते
धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषकरून धातुच्या वस्तू, सोनं-चांदी, नवीन गाडी-बाईक आणि नवीन घराची खरेदी करण्याची परंपरा आहे. पण शास्त्रानुसार आणि काही विशिष्ट परंपरानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची खरेदी (Buy Silver on Dhanteras) चांगलं असल्याचं सांगितले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या चांदीमध्ये वाढ होते अशी लोकांची भावना आहे. पण त्याचबरोबर गेल्या काही दिवसांतील चांदीच्या भावातील चढ-उतार पाहता दिवळीत चांदीमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. कारण या क्षेत्रातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, येत्या काळात सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीच्या भावात वाढ!
बाजारातील तज्ज्ञांनुसार, सोन्याचा होत असलेला कमी पुरवठा लक्षात घेता खरेदीदार आणि व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला होता. आज (दि. 21 ऑक्टोबर) मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 51,310 रुपये आहे. तीच स्थिती चांदीबाबतही आहे. चांदीलाही बाजारात भरपूर मागणी आहे; पण तितका पुरवठा होत नसल्यामुळे एक किलो चांदीचा भाव 63 ते 65 हजारांपर्यंत जाऊ शकतो. आज (दि. 21 ऑक्टोबर) 1 किलो चांदीचा भाव मुंबईत 56,150 रुपये आहे.
सोन्या-चांदीमधून चांगले रिटर्न मिळू शकतात?
बुलियन एक्सपर्टचं म्हणणं आहे की, सोन्याला घेऊन लोकांच्या शॉर्ट टर्म सेंटीमेंट खूप तीव्र आहेत. दिवळीत सोन्याचा आणि चांदीचा भाव वाढू शकतो. वर्षाच्या शेवटापर्यंत तर चांदीचा भाव 65,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्येही सोन्याचा आणि चांदीचा भाव वाढणार असल्याचे सांगितले जाते.
Digital Gold मध्ये गुंतवणुकीचा पर्याय चांगला!
भारतातील नागरिकांचं सोन्याबाबत एक भावनिक नातं जोडलेलं आहे. पण आता काही प्रमाणात लोकं डिजिटल स्वरूपात सोनं विकत घेऊ लागली आहेत. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर होऊ लागला आहे आणि सध्या ती काळाची गरजसुद्धा आहे. त्यामुळे डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक स्वरूपात वापरलं जाणारं भौतिक सोनं आता डिजिटल स्वरूपात गुंतवणुकीसाठी विचारात घेऊ लागले आहेत. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी डिजिटल स्वरूपात सोनं खरेदी (Dhanteras Gold Buying Time) करू शकता.
Best Time To Buy Car
सणासुदीचा हंगाम जवळ येताच, कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या डिस्काउंट ऑफर घेऊन येतात, म्हणूनच कार खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ असू शकतो. (Diwali is a good time to buy a car ) तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात तर अनेक कंपन्यांनी दिवाळीनिमित्त जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. त्याचा या दिवाळीत फायदा घ्यायला हरकत नाही.