Digital and physical gold: आपल्या देशात दरवर्षी सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, विशेषत: धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या दिवशी ती खरेदी करणे शुभ मानले जाते. आधी लोक सोन्या-चांदीचे दागिने विकत घेण्याला महत्व देत असत. पण आता लोक प्रत्यक्ष सोनं विकत घेण्याऐवजी डिजिटल स्वरूपात विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत. कारण डिजिटल सोन्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सोने फिजिकल स्वरुपाऐवजी कागदी स्वरूपात मिळते. म्हणजेच डिजिटल सोन्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या सुरक्षिततेची फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, त्या डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचे कागद तुमच्याकडे ठेवावे लागतील.
Table of contents [Show]
डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचे काही फायदे!
डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दागिन्यांप्रमाणे तुटण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती नसते. यासोबतच त्याच्या सुरक्षेसाठी लॉकरची व्यवस्था करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत, डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही डिजिटल सोने विकणाऱ्या कंपनी किंवा संस्थेबद्दल जाणून घ्या. तुम्ही सरकारी मान्यताप्राप्त कंपन्या किंवा विक्रेत्यांकडूनच डिजिटल सोने खरेदी करा.
नुकसान टाळण्यासाठी काय करावे?
MMTC-Pamp, Augmont आणि SafeGold सारख्या गोल्ड रिफायनर्सना (Gold Refiners)डिजिटल सोन्याच्या व्यवहारांसाठी सरकारने मान्यता दिली आहे. या सर्व कंपन्या ग्राहकांना डिजिटल सोने देण्यासाठी सोन्याच्या ब्रँडसोबत काम करतात. सध्या थर्ड पार्टीच्या माध्यमातून डिजिटल सोन्याची विक्री केली जात आहे. यासोबतच चांगली नेटवर्क असलेले ज्वेलर्सही स्वतःचे डिजिटल सोने ऑफर करत आहेत. अशा परिस्थितीत, नुकसान टाळण्यासाठी आपण काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त ज्वेलर्सकडूनच खरेदी करा!
डिजीटल सोने खरेदी करण्यापूर्वी, ज्वेलर्सला सरकारची मान्यता आहे की नाही याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुमच्या ज्वेलर्सला सरकारची मान्यता नसेल, तर तुम्ही त्याच्याकडून डिजिटल सोने खरेदी करणे टाळावे. (Government Approved Digital Gold Sellers)
डिजिटलपेक्षा फिजिकल सोनं महाग!
जर तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक केली असेल आणि तुम्हाला त्याचे फिजिकल स्वरुपात रुपांतर करायचे असेल, म्हणजे दागिन्यांच्या स्वरूपात सोने मिळवायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. कारण दागिने बनवण्यासाठी ज्वेलर्स पॉलिशच्या नावाखाली तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेतील. डिजिटल सोन्यापेक्षा भौतिक सोने नेहमीच महाग असते, कारण ग्राहकांना कर तसेच मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. अशा परिस्थितीत, जेव्हा गुंतवणूकदाराला त्याच्या डिजिटल सोन्याचे भौतिक सोन्यात रूपांतर करायचे असते तेव्हा त्याला दोनदा कर भरावा लागतो. (Invest in digital gold)
कंपनीच्या दाव्याची चौकशी करू शकत नाही
डिजिटल सोन्याची विक्री करणार्या कंपन्या नेहमी ग्राहकांना वचन देतात की ते त्यांच्या स्टोअरमधील गुंतवणूकीइतकेच सोने ठेवतील, परंतु याचा कोणताही पुरावा नाही किंवा तुम्ही ते तपासू शकत नाही. अशा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करणे टाळावे. (Companies selling digital gold)