Best Time To Buy Car In 2022: सणासुदीचा हंगाम जवळ येताच, कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या डिस्काउंट ऑफर घेऊन येतात, म्हणूनच कार खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. (Diwali is a good time to buy a car)तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात आणि महागड्या किमतीमुळे कार घेऊ शकत नाही तर आता तुम्हाला विचार करण्याची गरज नाही, कारण ह्युंदाई तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्य जबरदस्त ऑफर. कार उत्पादक कंपनी Hyundai त्यांच्या कारवर 1 लाखांपर्यंत सूट देत आहे. मात्र, ही सूट मर्यादित काळासाठी आहे. ह्युंदाईच्या कोणत्या कारवर किती सूट मिळत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
Table of contents [Show]
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक Hyundai Kona Electric
ही ह्युंदाई कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे. या कारवर सर्वात मोठा डिस्काउंट आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिक कारवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यासोबत कोणतेही एक्सचेंज किंवा कॉर्पोरेट बोनस नाही. कार 39 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह आहे. ही बॅटरी 136 hp आणि 395 Nm टार्क निर्माण करू शकते. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 452 किमीची रेंज देते.
Hyundai Grand i10 Nios ह्युंदाई ग्रँड i10 Nios
Hyundai आपल्या Grand i10 Nios कारवर 48,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही कार तीन पॉवरट्रेन म्हणजेच तीन इंजिनसह उपलब्ध आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी गिअरबॉक्स सारखे ऑप्शन आहे. कारची किंमत 5.43 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई ऑरा Hyundai Aura
ही एक चांगली कार आहे जी मारुती सुझुकी डिझायर आणि होंडा अमेझ सारख्या कारशी स्पर्धा करते. या कारमध्ये 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. Hyundai या कारवर 33,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
ह्युंदाई i20 Hyundai i20
कंपनीच्या या फेस्टिव्ह डिस्काउंट लिस्टमध्ये Hyundai i20 समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यावर 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस आणि रोख सवलत समाविष्ट आहे. ही सवलत ऑफर हॅचबॅकच्या मिड-स्पेक मगरा आणि स्पोर्ट्ज प्रकारांवर उपलब्ध आहे.