Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

October 2022 Car Offers : दिवाळीत ‘या’ कंपनीच्या कार खरेदीवर मिळवा डिस्काउंट!

October 2022 Car Offers

October 2022 Car Offers : Tata, Maruti, Hyundai, Honda आणि Datsun यासारख्या प्रसिद्ध कार कंपन्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर घेऊन आल्या आहेत. तर आज आपण अशाच एका कंपनीच्या ऑफर्स जाणून घेणार आहोत.

October 2022 Car Offers: दिवाळी जवळ आल्याने कार कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर आणण्यास सुरुवात केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी दिवाळी हा कार खरेदी करण्याचा उत्तम मुहूर्त मानला जातो. या सणासुदीच्या काळात, अनेक कार कंपन्या जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी कारवर बेस्ट ऑफ बेस्ट सूट देतात. तर आज आपण मारूती कंपनीच्या कोणकोणत्या गाड्यांवर किती सूट दिली जात आहे, हे पाहणार आहोत. 

October 2022 Car Offers

मारुती इग्निस (Maruti Ignis)

Maruti Ignis
Image Source : www.cardekho.com

मारुती इग्निस ही पाच सीटर क्रॉसओवर कार आहे; जी कॉम्पॅक्ट कारचा अनुभव देते. मारुती इग्निस ही त्याच्या आगळ्यावेगळ्या डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे. जी सहज परवडणाऱ्या किमतीत अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.

मारुती सियाज (Maruti Ciaz)

Maruti Ciaz
Image Source: www.carwale.com

बाहेरून दर्जेदार आणि आतून कम्फर्ट वाटण्यासाठी सियाजची रचना अतिशय उत्तम केली. कुटुंबासाठी ही अतिशय उत्तम कार मानली जाते. या कारवर ऑक्टोबर महिन्यात सूट दिली जात असून ग्राहक या कारच्या खरेदीवर 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही कार सिग्मा (बेस), डेल्टा, झेटा, अल्फा आणि एस (टॉप) या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही एक 5 सीटर कार आहे. ज्यात पाच लोक बसू शकतात. मारुती सियाझमध्ये 1.5 लीटर बीएस 6 पेट्रोल इंजिन सौम्य-हायब्रीड टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहे. हे इंजिन 105 PS पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

मारुती सुझुकी एस प्रेसो (Maruti Suzuki S Presso)

maruti suzuki s presso
Image Source: www.autocarindia.com

या कारचे सेफ्टी फीचर्स जबरदस्त आहेत. ड्रायव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर आहेत तर, फ्रंट पॅसेंजर एअरबॅग आणि फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर सारखी वैशिष्ट्ये त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. S-Presso ही रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करते, तर किमतीच्या बाबतीत ती मारुती WagonR आणि Alto K10 शी स्पर्धा करते.

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

Maruti Suzuki Dzire
Image Source:  www.cardekho.com

मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान आहे. डिझायर भारतात मे 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. यात क्लास-अग्रणी केबिन, आकार आणि वैशिष्ट्यांसह योग्य डिझाईन आहे. मारुती सुझुकी डिझायर ही मॅन्युअल किंवा AMT ऑटोमॅटिक पॉवरट्रेनसह येते.

मारुती सुझुकी सेलेरियो( Maruti Suzuki Celerio)

Maruti Celerio
Image Source: autoportal.com

सेलेरियो एक उत्कृष्ट सिटी राइड कार आहे जी चांगले मायलेज देते. या सणासुदीच्या काळात, मारुती Celerio च्या मॅन्युअल प्रकारांवर एकूण 51,000 रुपयांची सूट देत आहे. मारुती सेलेरियो LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या VXi व्हेरियंटसह CNG पर्याय ठेवण्यात आला आहे. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसह, त्याला 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड एएमटी पर्याय देण्यात आला आहे. इंजिनसह, याला सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट-स्टॉप वैशिष्ट्य देखील मिळते.