Digital gold: सोनं ही मौल्यवान वस्तू असल्याने ते सुरक्षित ठेवण्यासाठी जागा आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास, गुंतवणूकदारांना, कधीकधी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकरसाठी (Locker) पैसे द्यावे लागतात. परंतु डिजिटल सोन्यात गुंतवणूक केल्याने अशा सर्व स्टोरेज समस्या दूर होतात, कारण सोने डिजिटल स्वरूपात ठेवले जाते. त्यामुळे ते चोरीला जाऊ शकत नाही.(Advantages of digital gold)
Table of contents [Show]
Digital gold : फक्त 1 रुपयात गुंतवणूक
आपले पैसे डिजिटल सोन्यात गुंतवण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही रु. 1 इतकी कमी गुंतवणूकही करू शकता. अनेक डिजिटल पेमेंट अॅप्स गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी कमी गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत.
Digital gold : क्वालिटी आणि शुद्धतेचं टेन्शन नाही
डिजिटल सोने खरेदी करणारे ग्राहक गुंतवणूक करताना धातूची शुद्धता निवडू शकतात. गुंतवणूक प्लॅटफॉर्म 18-कॅरेट सोने, 22-कॅरेट सोने आणि 24-कॅरेट सोने असे अनेक पर्याय देतात. गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता निवडू शकतात.
Digital gold : टॅक्स बेनिफिट
खरेदीच्या ३६ महिन्यांच्या आत डिजिटल सोने विकणाऱ्या गुंतवणूकदारांना (investors) नफ्यावर टॅक्स भरावा लागत नाही. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 36 महिन्यांनंतर सोने विकले, तर परताव्यावर 20% आणि 4% CGT (Capital Gains Tax) आकारला जातो.
Digital gold : घरपोच ऑर्डर
गुंतवणूकदार त्यांच्या डिजिटल सोन्याचे फिजिकल सोन्यात रूपांतर करू शकतात. बहुतेक गुंतवणूक प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून देतात. त्यांना घरी ऑर्डर करण्यापूर्वी डिजिटल सोन्यात किमान रक्कम गुंतवावी लागेल.