Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dhanteras 2022 Gold Price : दिवाळीत सोनं 53 हजारांवर जाऊ शकतं! लग्नाच्या सीझनमध्ये होऊ शकते आणखी वाढ!

Dhanteras 2022 Gold Price

Dhanteras 2022 Gold Price : धनत्रयोदशी आणि ऐन दिवाळीत सोन्याचा भाव 53,000 रुपये प्रति 10 ग्राम होऊ शकतो. तर चांदीचा भाव 63,000 रुपये प्रति किलो होऊ शकतो.

Dhanteras 2022 Gold Shopping : देशभरात सणांचा माहोल सुरू आहे; अशा सणांच्यावेळी बहुतेककरून लोक सोनं-चांदीची खरेदी करतात. तुम्ही जर दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी (Diwali 2022) सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या दिवाळीत सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 53,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर चांदीची किंमत 63,000 रुपये होऊ शकते. (Dhanteras Gold Offers)


या सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते. याचं कारण सोन्याचा कमी झालेला पुरवठा (Supply of Gold Decreased) हा आहे. बॅंकांकडून होणारा सोन्याच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. म्हणजे सणासुदींच्या काळात सोन्याची वाढती मागणी असूनसुद्धा भारताला गरजेपेक्षा कमी सोनं मिळत आहे.

असे असतील सोन्या-चांदीचे भाव!

बाजारातील तज्ज्ञांनुसार, सोन्याचा होत असलेला कमी पुरवठा लक्षात घेता खरेदीदार आणि व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे दिवळापर्यंत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांपर्यंत जाऊ शकतो. तीच स्थिती चांदीबाबतही आहे. चांदीलाही बाजारात भरपूर मागणी आहे; पण तितका पुरवठा होत नसल्यामुळे दिवाळीत एक किलो चांदीचा भाव 63 हजारांपर्यंत जाऊ शकतो. तर वर्षा अखेरपर्यंत चांदीचा भाव 65 हजारांपर्यंत जाऊ शकतो.


सोनं कपातीमागे हे असू शकतं कारण!

भारत ज्या दराने सोनं खरेदी करत आहे. त्या तुलनेत चीन आणि तुर्कीसारखे देश सोन्यासाठी अधिक किंमत मोजत आहेत. त्यामुळे अधिक फायदा मिळवण्यासाठी बॅंकांनी चीन आणि तुर्कीसारख्या देशांना सोन्याचा पुरवठा वाढवला आहे. गेल्या वर्षी भारतीयांनी 4 डॉलर प्रति औंसच्या प्रीमियमने सोनं खरेदी केले होते, ते आता 1 ते 2 डॉलर प्रीमियमवर आले आहे.

गोल्ड इम्पोर्टमध्ये 30 टक्के घसरण!

भारताच्या तुलनेत चीनमधील मोठमोठे व्यापारी 20 ते 45 डॉलर प्रीमियम ऑफर करत आहेत. तर तुर्कीकडून 80 डॉलरपर्यंत प्रीमियम दिला जात असल्याची माहिती कळत आहे. त्यामुळे भारताच्या सोनं आयातीत 30 टक्क्यांनी घसरण झाली. तर तुर्कीमधीस सोन्याच्या आयातीचं प्रमाण 543 टक्के झालं. तर दुसरीकडे हॉँगकॉंगद्वारे चीनमध्ये पोहचणाऱ्या सोन्यात 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे ऑगस्टमध्ये दिसून आलं आहे.

Gold Rate Chart on 10 October 2022
Source : www.goodreturns.in/gold-rates/

गंगाजळीतील सोन्यात घट!

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी भारतीयांकडील सोन्यात 10 टक्क्याने कपात झाली. दरवर्षी दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर भारतात काही टन सोन्याचा पुरवठा असायचा. पण यावेळी काही किलोंमध्येच आहे. जर ही स्थिती बदलली नाही तर सोन्याच्या किमती गगनाला भिडतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात अक्षय्यतृतीया, दसरा आणि धनत्रयोदशी-दिवाळीनंतर लग्नाचा सिझन सुरू होतो. त्यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सोन्याचा भावही त्याच पटीने वाढू शकतो.