Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Before Property Buying: कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या; पुनर्विक्रीत होईल फायदा

Before Property Buying

Before Property Buying: मालमत्ता खरेदी करताना विचार करून घेतलेला निर्णय भविष्यकाळात पुनर्विक्रीच्या वेळी फायदा मिळवून देतो.

Before Property Buying: मालमत्ता हा गुंतवणुकीसाठी(Investment) सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्या बरीशीच भारतातील शहरे ही विकसनशील(Developing Phase) टप्प्यातून जात आहेत ज्यामुळे नजीकच्या भविष्यात मालमत्तेचे दर वाढण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा ठिकाणाच्या निवासी मालमत्ता(Residential Property) किंवा व्यावसायिक मालमत्तेमध्ये(Commercial Property) गुंतवणूक करून चांगला परतावा तुम्हीही मिळवू शकता. तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा(Returns) मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्याचा फायदा तुम्हाला पुनर्विक्रीच्या(Resale) वेळी देखील कामी येऊ शकतो. चला तर याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

मालमत्तेचे ठिकाण किंवा स्थान(Property Location)

मालमत्तेचे स्थान(Property Location) ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी तिची मूल्य(Value) ठरवते. ठराविक कालावधीत चांगला परतावा मिळावा या उद्देशाने तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विकसित भागात मालमत्तांमध्ये गुंतवणूक(Investment) करणे फायद्याचे ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या मालमत्ता या आधीपासून प्राईम (मुख्य) भागात आहेत त्याच्या तुलनेत अशा मालमत्तांची गुंतवणूकीची प्रारंभिक किंमत कमी आहे.

सामाजिक पायाभूत सुविधा(Social Infrastructure Facility)

शाळा-महाविद्यालये(School-Colleges), शॉपिंग कॉम्प्लेक्स(Shopping Complex), उद्याने(Gardens) आणि रुग्णालये(Hospitals) यासारख्या सामान्य सुविधा नजीक असल्या तर चांगल्या किमतीसाठी खरेदीदारांना आकर्षित करता येत. अशा मालमत्ता तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नेहमी अशा सुविधांच्या(Facility) उपलब्धतेबद्दल जाणून घ्या. मालमत्तेला किमान भविष्यात अशा विस्ताराची शक्यता असायला हवी.

वाहतुकीची सुविधा काय?(Connectivity)

ज्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे, त्या ठिकाणी वाहतुकीची(Transport Facility) काय सुविधा उपलब्ध आहे हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. उत्तम वाहतुकीची साधने असतील तर त्या ठिकाणाला सर्वात जास्त भाव मिळण्याची शक्यता असते. याशिवाय आपल्या सोयीसाठी येणे जाणे करणे सहज शक्य होते. रेल्वे स्टेशन(Railway Station), बस स्टॅन्ड(Bus Stand), रिक्षा स्टॉप(Auto Stand) यासारखी अनेक सार्वजनिक वाहतुकीची साधने मालमत्तेपासून जवळ असायला हवीत.

सर्वसाधारण भाडे किती मिळू शकते?(Basic Rent)

तुम्ही भाड्याने(Rent) मालमत्ता देण्याचा विचार करत असाल किंवा व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) खरेदी करत असाल तर त्या मालमत्तेला सध्या आणि भविष्यात किती भाडे(Rent) मिळू शकते आणि तेथे कोणत्या गोष्टी आगामी काळात येणार आहेत याचा विचार देखील करणे गरजेचे आहे.

व्यावसायिक केंद्राच्या सानिध्यात(Commercial Hub)

कॉर्पोरेट ऑफिस(Corporate Office) आणि कमर्शियल हबच्या(Commercial Hub) जवळ असलेल्या मालमत्तेमुळे तुम्हाला चांगला परतावा सहज मिळू शकतो. एवढेच नाही तर भाडेतत्त्वावर(Rent) देऊन तुम्ही चांगला नफाही कमाऊ शकता. अशा ठिकाणी गुंतवणूक केल्याने त्या जागेची किंमत ही कैक पटीने वाढते. तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासी मालमत्ता(Residential Property) म्हणून देखील भाड्याने देऊन नफा कमावू शकता.