Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai MHADA Homes : मुंबईत घर घेण्याची लवकरच संधी मिळणार

Mumbai MHADA Homes

Image Source : www.india.postsen.com

मुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत. 

इथे मिळणार घर (MHADA Homes)

मुंबईपासून जवळ यातील बहुतांश घरं असणार आहेत. वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई, कोकणमधील वेंगुर्ला या भागांमध्ये घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये अत्यल्प गटासाठी 1 हजार 1, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 23, मध्यम उत्पन्न गटासाठी 18 तर उच्च उत्पन्न गटासाठी 4 घरं (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. 

पुणे, औरंगाबादमधील घरांचीही जाहिरात लवकरच (MHADA Lottery)

याव्यतिरिक्त पुणे,  औरंगाबाद  मंडळांतील घरांचीही जाहीरात म्हाडाकडून देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यानुसार, औरंगाबादमधील 800,  पुण्यातील 4 हजार 678 घरांसाठी जाहीरात देण्यात येणार आहे. यामुळे सर्व मिळून जवळपास 7 हजार जणांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी येत्या काळात उपलब्ध होणार आहे.  या लॉटरीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांनाच यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

म्हाडाकडून घरांची अनामत (deposit)  रक्कम वाढवण्यावर भर देण्यात आला होता. आता मात्र अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेतील कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.  मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम मात्र काहीशी वाढू शकते.

मोठ्या संख्येने घर उपलब्ध होत असल्याने ही एक चांगली संधी निर्माण झाली आहे. यामुळे 2 हजारपेक्षा अधिक नागरिकांना मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. येत्या काही कालावधीत औरंगाबाद, पुणे इथेही घर घेता येणार आहे. यामुळे एकूण जवळपास 7 हजार जणांना  येत्या काही दिवसात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे