Slum Rehabilitation Authority, Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM. Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DCM. Devendra Fadnavis) यांनी सोमवारी मंत्रालयात वरळी(Varali), नायगाव(Naygaon) आणि एन.एम.जोशी मार्ग(N.M.Joshi) या ठिकाणच्या बीडीडी(BDD) चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी शिंदे यांनी बीडीडी चाळीच्या कामाला गती देताना बांधकाम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा(New Technology) वापर करून दर्जेदार काम करण्याचा सल्ल्ला देखील दिला आहे. यावेळी झोपडपट्टीधारकांना 300 चौरस फुटांची(Sq.feet) घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अनेक चर्चा देखील या बैठकीत झाल्या आहेत. चला तर याबद्दल सविस्तर बातमी जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदेंनी बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेचा घेतला आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात वरळी, नायगाव आणि एनएम जोशी मार्ग या ठिकाणच्या बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी शिंदे यांनी बीडीडी चाळीच्या कामाला गती देताना बांधकाम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा(New Technology) वापर करून दर्जेदार काम करण्याचा सल्ल्ला देखील दिला आहे. यावेळी झोपडपट्टीधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णया अंतर्गत झोपडपट्टीधारकांना 269 चौरस फुटांऐवजी 300 चौरस फुटांची(Sq. feet) घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याशिवाय पात्र झोपडपट्टीवासीयांना संक्रमण शिबिराच्या ठिकाणी मागणीनुसार दरमहा भाडे(Per Month Rent) देण्याचा पर्यायही देण्यात येणार आहे.
या ठिकाणच्या बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास
या बैठकीमध्ये म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर(Anil Diggikar) यांनी या प्रकल्पा संदर्भातील सादरीकरण केले. वरळी, नायगाव, एनएम जोशी या भागात एकूण 159 बीडीडी चाळी आहेत. वरळीमध्ये पहिल्या टप्प्यात 121 चाळींपैकी 34 चाळी आणि 2 520 चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. दुसरीकडे, नायगावमधील 42 चाळींपैकी 23 चाळी आणि 1824 गाळ्यांचा आणि एम.एन. जोशी मार्गावर असलेल्या 32 चाळींपैकी 16 चाळी आणि 1280 गाळ्यांचा पहिल्या टप्प्यात पुनर्विकास करण्यात येणार आहे.
पुनर्विकासानंतर कोणत्या सुविधा मिळतील?
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा(Gym), ललित कला भवन, रुग्णालय(Hospital), शाळा(School), जॉगिंग ट्रॅक(Jogging Track), कम्युनिटी हॉल(Community Hall), ज्येष्ठ नागरिक प्लाझा(senior citizen Plaza) यासह विविध सुविधा(Facility) उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे माहिती बैठकीत सांगण्यात आहे. या बैठकीमध्ये महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर(Dr. Nitin Karir), गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये(Anand Limaye), मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर(Vivek Phansalkar), पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार(Radheshyam Mopalwar) इत्यादी लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.