Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Slum Rehabilitation Authority: झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरांनाही मिळणार पुनर्वसनाचा लाभ

Slum Rehabilitation Authority

Image Source : timesofindia.indiatimes.com

Slum Rehabilitation Authority: खासदार शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी चर्चा करून झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्यांचा पुनर्विकासासाठी विचार करावा, अशी मागणी केली होती.

Slum Rehabilitation Authority: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी (Slums Residents) मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (Slum Rehabilitation Authority) झोपडपट्टीतील पहिल्या मजल्यापर्यंत पुनर्वसन लाभ देण्याचा विचार करत आहे. म्हणजेच आता झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर(First Floor) राहणाऱ्या रहिवाशांना ही पुनर्वसनाचा फायदा होणार आहे. याबाबत खासदार गोपाळ शेट्टी(Gopal Shetty) यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी सातत्याने पत्रव्यवहार चालू होता. त्यावर एसआरएकडून(SRA) सकारात्मक उत्तर मिळाले आहे.

खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

खासदार शेट्टी(Gopal Shetty) यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी चर्चा करून झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्यांचा पुनर्विकासासाठी विचार करावा, अशी मागणी केली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने खासदार शेट्टी यांच्या या मागणीला 23 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्राद्वारे सर्व तांत्रिक मुद्द्यांसह सकारात्मक उत्तर दिले आहे असून पहिल्या मजल्यावर असलेल्या झोपडपट्टीतील घरांनाही पुनर्वसनाचा लाभ मिळायला हवा, असे मान्य केले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे म्हणणे काय?

महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाला लिहिलेल्या पत्रात, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे(Satish Lokhande) यांनी मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या 22 सप्टेंबर 2019, 11 जुलै 2020 आणि 12 जुलै 2020 रोजीच्या विनंतीचा संदर्भ देत लिहिले आहे की, ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण(Slums Residents) 2001 च्या नियमांनुसार, केवळ जमिनीवरील झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र आहेत मात्र 2015 च्या योजनेअंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांच्या प्रत्येकाला पक्के घर मिळण्याच्या योजनेनुसार, जुन्या चाळी किंवा वस्तीमध्ये राहणाऱ्या घर मालकांनी बांधलेल्या पहिल्या मजल्यावरील घरेही पुनर्वसन घरे म्हणून ओळखली जाऊ शकतात. 
झोपडपट्टी पुनर्वसन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DCM. Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाच्या 28 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मागणीनुसार पहिल्या मजल्यावरील झोपड्यांना पर्यायी घरे देण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. 
अखेर झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावरील जुन्या रहिवाशांना येत्या नवीन वर्षात राज्य सरकारकडून हक्क मिळण्याची शक्यता असल्याबद्दल खासदार शेट्टी यांनी झोपडपट्टी प्राधिकरणाच्या या तपशीलवार पत्राबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.