Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone: भारतात Android Smartphone होतील महाग, गुगलने दिला इशारा

Smartphone

Smartphone: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया(CCI) च्या नव्या निर्णयामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील असा इशारा गुगलने दिला आहे.

Smartphone: हल्ली आपण सगळॆच स्मार्टफोनचा(Smartphone) वापर करू लागलो आहोत. आपल्या अगदी छोट्या गरजेपासून ते मोठ्या गरजेपर्यंत स्मार्टफोन आपल्याला मदत करत आहेत. याच स्मार्टफोन संदर्भात गुगलने(Google) एक इशारा दिला आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार भारतात android Smartphone  महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलने असा इशारा का दिलायं, चला जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय?(What exactly is the case?)

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया(CCI) च्या नव्या निर्णयामुळे भारतात स्मार्टफोन(Smartphone) आणखी महाग होतील असा इशारा गुगलने दिला आहे. याअगोदर टेक जायंटने युजर्सच्या सुरक्षेबाबत संभाव्य धोक्याबद्दल इशारा दिला होता. 2022 मध्ये CCI ने दोन वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये Google वर 2273 कोटी रुपयांचा दंड शिक्षा स्वरूपात दिला होता. Android मोबाईल डिव्हाइस इको सिस्टममध्ये त्याच्या ठिकाणाचा गैरवापर केल्याबद्दल गूगलला हा दंड ठोठावण्यात आला होता. यासाठी एका प्रकरणात कंपनीला 1337 कोटी रुपये आणि  प्ले स्टोअरद्वारे(Play Store) मक्तेदारीचा गैरवापर केल्याबद्दल  936 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे CCI ने गुगलवर स्मार्टफोन निर्मात्यांसोबत एकतर्फी करार केल्याचा आरोप देखील केला आहे. त्यामुळे सीसीआयच्या निर्णयाविरोधात गुगलने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सीसीआयच्या या निर्णयामुळे भारतात अँड्रॉइडचा(Android) विस्तार  थांबेल असा युक्तिवाद गुगलकडून करण्यात आला आहे.

गुगल काय म्हणतयं?(What does Google say?)

Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, CCI आदेश देशात डिजिटल अवलंबनाला गती देण्याच्या प्रयत्नांवर परिणाम करत आहे. तर याउलट सर्च जायंटने म्हणणे आहे की, 2008 मध्ये जेव्हा अँड्रॉइडने पहिल्यांदा स्मार्टफोन लॉन्च(Smartphone Launch) केला होता  तेव्हा तो खूप महाग होता. मात्र गेल्या काही वर्षांत Google ने फोन निर्मात्यांना स्मार्टफोन अधिक परवडणारे बनवणे शक्य केले आहे. याशिवाय गुगल प्ले स्टोअरवरील अॅप्स वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आहेत आणि याची खात्री करण्यासाठी Google त्यांना सुरक्षा आणि मालवेअरसाठी स्कॅन देखील प्रदान करते.