भारताने डिजिटल इंडिया मिशन (Digital India Mission)मधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी 5G इंटरनेट सेवा लॉन्च केली. लवकरच 5G सेवा ग्राहकांना अनुभवता येणार आहे. भारतात Reliance Jio आणि AirTel या कंपन्यांनी 5G सेवा सुरू करण्याबाबतचे आपले प्लॅन जाहीर केले आहेत. लवकरच म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर 5G सेवा सुरू होईल, असे दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 5G मोबाईलला भलतीच मागणी वाढू लागली आहे.
भारतात 5G सुरू होण्यापूर्वीपासूनच 5G कॉम्पिटेबल मोबाईलची जोरदार विक्री सुरू झाली होती. सरकारने 5G सेवेचा लिलाव सुरू केल्यानंतर 5G मोबाईलची क्रेझ आणखी वाढली. सरतेशेवटी येत्या दिवाळीपासून ज्यांच्याकडे 5G कॉम्पिटेबल मोबाईल आहे. त्यांना या नवीन सेवेचा अनुभव घेता येणार आहे. 4G पेक्षा 5G चा स्पीड दहापट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सर्वांनाच 5G मोबाईल आणि 5G इंटरनेट सेवेचे वेध लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेचं उद्घाटन केल्यानंतर सांगितलं की, पहिल्या टप्प्यात देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. त्यातही अगोदर मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई या 4 महानगरांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. (5G Internet service started)
रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीची 5G सेवा लवकरच सुरू होईल. रिलायन्स जिओने तर स्वस्तातला 5G मोबाईल आणण्याची घोषणादेखील केली. जिओचा स्वस्तातला फोन येण्यापूर्वी ग्राहकांसाठी बाजारात अनेकप्रकारचे मॉडेल आणि वेगवेगळ्या किमतीतील फोन उपलब्ध आहेत. आज आपण अशाच स्वस्त आणि मस्त म्हणजे किमान 20 हजार रुपयांपर्यतचे 5G फोनची माहिती घेणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
बाजारात 20 हजार रुपयांच्या आतील किमतीत सर्वोत्कृष्ट 5G मोबाईल फोन 5G सपोर्टसह उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा ट्रिकल-डाउन प्रभाव आता 20 हजारापेक्षा कमी किमतीच्या आणि 15 हजारापेक्षा कमी किमतीच्या फोनवर 5G कनेक्टिव्हिटी करत आहे. म्हणून, जर तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी काही सर्वोत्तम 5G मोबाइल फोन पर्याय उपलब्ध आहे ते पुढीलप्रमाणे.