Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone Security Tips: तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवायचा असेल, तर या 5 टिप्स नक्की फॉलो करा

Smartphone Security Tips

Image Source : newsdailyindia.com

Smartphone Security Tips: आपले पर्सनल डॉक्युमेंट सेव्ह करण्यापासून ते ऑनलाईन व्यवहार करण्यापर्यंत आपण याच स्मार्टफोनचा वापर करत असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलला सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.

Smartphone Security Tips: आजकाल आपण सगळेच स्मार्टफोन(Smartphone) वापरायला लागलो आहोत. प्रगत तंत्रज्ञानमुळे आपले आयुष्य अगदी सुखकर झाले आहे. आपले पर्सनल डॉक्युमेंट(Personal Document) सेव्ह करण्यापासून ते ऑनलाईन व्यवहार(Online Transaction) करण्यापर्यंत आपण याच स्मार्टफोनचा वापर करत आहोत. हल्ली स्पॅम लिंक, व्हायरस किंवा फोन हॅकिंगच्या मदतीने बँक अकाऊंट किंवा नेट बँकिंग(Net Banking) खात्याशी संबंधित माहिती मिळवून तुमच्या बँकेतील सर्व पैसे लंपास करता येतात. त्यामुळे स्मार्टफोनची सुरक्षितता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतःला ऑनलाईन फ्रॉडपासून(Online Fraud) सुरक्षित ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

फोन अपडेट करा(Update the phone)

स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे वेळोवेळी अपडेट(Update) देत असतात. तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपडेट ठेवल्यास, डिव्हाइसच्या जुन्या OS सिस्टीम मध्ये असलेले अनेक प्रकारचे व्हायरस आणि बग काढून टाकण्यात येतात, ज्यामुळे डिव्हाइसवरील मालवेअर(Malware) आणि व्हायरसचा धोका कमी होण्यास मदत होते.

वेळोवेळी फोनचा पासवर्ड बदला(Change the phone password from time to time)

आपण दिवसांपर्यंत एकच पासवर्ड(Password) वापरत असतो,असा पासवर्ड फोनमध्ये जास्त वेळ ठेवू नये. फोनचा पासवर्ड वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे. पासवर्ड बदलल्याने स्मार्टफोन हॅक(Smartphone Hack) होण्याचा धोका कमी असतो. कोणत्याही अॅपवर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सेव्ह करण्यापूर्वी त्यांच्या टर्म्स अँड कंडीशन(Terms & Condition) काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

स्मार्टफोनला नेहमी लॉक ठेवा(Always keep the smartphone locked)

सगळ्याच स्मार्टफोनमध्ये आजकाल फोन लॉक(Lock) करण्याची सोय असते. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्याशी संबंधित काही डॉक्युमेंट आणि स्वतःचे पर्सनल फोटो(Personal Photo) यासारखी माहिती  ठेवत असाल तर फोन लॉक करणे गरजेचे आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये फोन लॉक(Lock) करण्यासाठी बरेच इनबिल्ट फीचर्स(Inbuilt Features) जसे की पिन, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंट यासारख्या सुविधा देण्यात आलेल्या असतात.

सर्टिफाइड सोर्सकडून अॅप्स डाउनलोड करा(Download apps from certified sources)

बऱ्याच वेळा आपण अनसेफ लिंक(Unsafe Link) आणि अनसर्टिफाइड प्लॅटफॉर्मवरून गेमिंग अॅप किंवा इतर अॅप डाउनलोड करतो. अशा परिस्थितीत, डिव्हाइसशी संबंधित बहुतेक माहिती स्पॅमर्स किंवा थर्ड पार्टी(Third Party) अॅप्सच्या युजरपर्यंत पोहोचते, ज्यामुळे ऑनलाईन गंडा घातला जाऊ शकतो. म्हणून अँड्रॉइड स्मार्टफोन युजरने केवळ Google Play Store वरून अॅप डाउनलोड करावेत तर iPhone युजरने  Apple Store वरून अॅप डाउनलोड करावेत.

अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरणे(Using anti virus software)

ऑनलाईन फसवणुकीमध्ये बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की, हॅकर्स किंवा स्पॅमर फोनवर स्पॅम लिंक(Spam Link) पाठवतात. यामध्ये वाय-फायचा वापर हे सर्वात मोठे कारण बनले आहे. अँटी व्हायरस सॉफ्टवेअरमुळे(Anti virus software) तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून व्हायरस आणि मालवेअर काढून टाकू शकता, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक तपशील सुरक्षित राहू शकतात.