• 05 Feb, 2023 13:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने दुबईत खरेदी केली 80 मिलियन डॉलरची प्रॉपर्टी

Anil Ambani's Property in Dubai

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हे दुबईमध्ये शेजारी शेजारी आहेत. अनंत अंबानींच्या या आलिशान घरात अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

Anant Ambani's Property in Dubai: रिलायन्स इंडस्ट्रीचे(Reliance Industries) सर्वेसर्वा मुकेश अंबानी(Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या राहणीमानाबाबत लोकांना प्रचंड आकर्षण आहे. मुकेश अंबानींच्या लहान मुलाने अनंत अंबानीने(Anant Ambani) दुबईत(Dubai) एक अत्यंत आलिशान आणि महागडं घर खरेदी केलं आहे. खरं तर हे घर नसून एक आलिशान विलाच आहे असं म्हणावं लागेल. या आलिशान घराची किंमत 80 मिलियन डॉलर इतकी असून भारतीय चलनानुसार या घराची किंमत 63 कोटी 96 लाख 74 हजार 400 इतकी आहे. विशेष म्हणणे दुबईत अनंत अंबानींचा शेजारी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आहेत. अनंत अंबानींच्या या घराबद्दल चला जाणून घेऊयात.

कसं आहे अंनत अंबानींचे आलिशान घर?(How is the luxurious home?)

अनंत अंबानींनी खरेदी केलेले घर दुबईच्या उत्तरी भागात असून एकापेक्षा एक खास लक्झरी सुविधा(luxury facility) यामध्ये देण्यात आल्या आहेत. दुबईच्या पाम जुमेराह(Palm Jumeirah, Dubai) या ठिकाणी ही प्रॉपर्टी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतने खरेदी केली आहे. 2022 च्या सुरुवातीलाच त्याने दुबईत ही इन्व्हेस्टमेन्ट केली असून या आलिशान घराची किंमत 80 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार या घराची किंमत 63 कोटी 96 लाख 74 हजार 400 इतकी आहे. या प्रॉपर्टीचा व्यवहार हा गुप्त ठेवण्यात आला होता. हे घर समुद्रकिनारी असून ते अतिशय आकर्षित आहे. प्रत्येक सुखसोयींची खास काळजी या घरात घेण्यात आली आहे. एकूण 10 बेडरुम असलेल्या या घरात पाहुण्यांना राहण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. या घराच्या आतील आणि बाहेरील बाजूस दोन स्विमिंग पूल(swimming pools) आहेत. याशिवाय घराच्या अवतीभवती खेळण्यासाठी प्रशस्त मोठी जागा आहे. विशेष म्हणजे एक प्रायव्हेट जीमसोबत(private gym) एक प्रायव्हेट थिएटरही(private theater) घरामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

किंगखान आहे शेजारी(Bollywood King Shahrukh neighborhood)

अनंत अंबानी यांनी खरेदी केलेल्या घराच्या जवळच शाहरुख खानने दुबईत एक बंगला खरेदी केला आहे. त्यामुळे आता शाहरुख खान(Shah Rukh Khan) व अनंत अंबानी हे शेजारी-शेजारी झाले आहेत. शाहरुख खान, ब्रिटिश फुटबॉलर डेविड बेकहम(David Beckham) यांनीही दुबईमध्ये घर खरेदी केले आहे. जगभरातील लोकांनी दुबईत येऊन रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवावेत, यासाठी तेथील सरकार प्रोत्साहन देत असल्याचे समोर आले आहे.