Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Antilia:अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा साखरपुडा 'अँटिलिया' येथे संपन्न झाला, तुम्हाला माहिती आहे अँटिलिया काय आहे

Anant Ambani and Radhika Merchant Engagement

Image Source : http://www.twitter.com/

Anant Ambani and Radhika Merchant Engagement: रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा साखरपुडा धुमधडाक्यात अँटिलिया येथे पार पडला. अँटिलिया या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक बाॅलिवुड दिग्गजांनी हजेरी लावली. अखेर अँटिलिया हे काय आहे, याबाबत जाणून घेवुयात.

Mukesh Ambani Antilia House Price: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या साखरपुडयाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याचा हा साखरपुडा मोठया वैभवशाली संपन्न असणाऱ्या ‘अँटिलिया’ या ठिकाणी पार पाडला. अँटिलिया येथे मोठ-मोठया उदयोगपती, बाॅलिवुड इंडस्ट्रीचे कलाकारसह राजकीय नेतेदेखील  उपस्थित होते. अँटिलिया काय व कुठे आहे, हे पाहुया 

अँटिलिया काय आहे (What is Antilia)

अँटिलिया हे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. त्यांचे हे आलिशान घर दक्षिण मुंबईत आहे. अँटिलिया ही 27 मजल्यांची इमारत असून 4,00,000 चौरस फूटमध्ये बनविली आहे. याची किंमत सुमारे 11 हजार कोटी असल्याचे सांगितले जात आहे. या 27 मजली आलिशान घरात प्रत्येक फ्लोअरवर एक हेड कर्मचारी आहेत. प्रत्येक मजल्यावर असणारा मॅनेजर हा वर्षाला 2 कोटी पगार घेतो. या शानदार घरात एकूण 600 कर्मचारी काम करतात.

काय सुविधा आहेत (What are The Facilities)

दक्षिण मुंबईतील हे आलिशान अँटिलियामध्ये सुविधादेखील तितक्याच शानदार आहेत. येथे सेव्हन स्टार सुविधांचा समावेश आहे. या महागडया इमारतीत स्विमिंग पूल, बॉलरूम, 3 हेलीपॅड, मंदिर, गार्डन, 2 मजली हेल्थ सेंटर व 50 लोकांची क्षमता असलेले सिनेमागृह (थिएटर) आहे. 168 कार पार्किंगची सुविधा आहे. या आलिशान घरात 9 सरकते जिने आहेत. तसेच योग सेंटर, डान्स स्टुडिओ व हेल्थ स्पा देखील आहेत.

अँटिलिया येथे साखरपुडयाला दिग्गजांची उपस्थिती

जगातील सर्वात श्रीमंत यादीत असणारे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट याचा अँटिलिया येथे नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुडयाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बाॅलिवुड कलाकार सलमान खान, शाहरूख खान, एेश्वर्या राय, दिपिका पदुकोन, रणवीर सिंग, अक्षय कुमार, वरूण धवन, कॅटरिना कैफ, जान्हवी कपूर सह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.